टँकरमधील दुध सोडून दिले; शेतकऱ्यांनी रस्त्यावर ओतले

milk
milk

बीड : भाववाढीसाठी सुरु असलेल्या दुध बंद आंदेालनाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी (ता. १७) जिल्ह्यात स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दुध वाहतूक करणाऱ्या टँकरमधील दुध रस्त्यावर सोडून दिले. तर, कडा (ता. आष्टी) येथे शेतकऱ्यांनी दुध रस्त्यावर ओतून आंदेालन केले. 

दुसऱ्या दिवशीही जिल्ह्यात दुध संकलन ठप्प होते. शासकीय दुध योजनेमार्फत संकलीत होणारे १६ हजार पाचशे लिटर दुध नियमितप्रमाणे संकलीत झाले. मात्र, खासगी संस्था व सहकारी संघांचे दुध संकलन पुर्णपणे ठप्प हेाते. त्यामुळे साधारण अडीच लाख लिटर दुधाचे संकलन ठप्प राहील्याचा अंदाज आहे. दरम्यान, स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुजरातहून हैदराबादकडे दुध घेऊन जाणारा टँकर परिसरातील पाली येथे अडविला.

टँकरमधील दुध रस्त्यावर सोडून देण्यात आले. यावेळी दुध भरुन नेण्यासाठी ग्रामस्थांची एकच झुंबड उडाली. आष्टी तालुक्यातील कडा येथे शेतकऱ्यांनी दुध रस्त्यावर ओतून आंदोलनाला पाठींबा दिला. पाली येथील आंदोलनात स्वाभीमानीचे जिल्हाध्यक्ष कुलदिप करपे, युवती आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा पुजा मोरे, राजू गायके, ज्योत्स्ना खोड, अश्विनी सपकाळ, राजेंद्र डाके, धनंजय मुळे, अर्जुन सोणवने आदींनी सहभाग घेतला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com