सहा तटस्थ, तर एक गैरहजर

सहा तटस्थ, तर एक गैरहजर

स्वीकृत सदस्यांच्या उपस्थितीने झाला घोळ
औरंगाबाद - महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी सहा सदस्यांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. एक उशिरा आले, तर एक गैरहजर राहिल्याने 113 सदस्यांनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला. स्वीकृत सदस्यांना मतदानाचा अधिकार नसतो तरीही ते सभागृहात हजर राहिल्याने महापौरपदाच्या निवडणुकीच्यावेळी उपस्थित सदस्य आणि मतांची मोजणी करताना थोडासा गोंधळ उडाला होता.

महापौरपदासाठी एकूण 112 सदस्यांनी, तर उपमहापौर पदासाठी 113 सदस्यांनी मतदान केले. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मुल्ला सलीमा बेगम, परवीनबेगम कैसरखान, अंकिता विधाते आणि ज्योती मोरे या चार सदस्यांसह बहुजन समाज पार्टीच्या सुनीता रामराव चव्हाण आणि राहुल सोनवणे अशा एकूण सहा सदस्यांनी निवडणुकीत तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला होता.

सदस्य 115, उपस्थित 117
सभागृहात उपस्थित सदस्यांच्या स्वाक्षरी घेऊन मोजणी केली असता ती संख्या 117 झाली. यामुळे पीठासीन अधिकाऱ्यांसह सर्वजण संभ्रमित झाले. नगरसेवकांची संख्या एवढी वाढली कशी? नंतर स्पष्ट झाले की सुनीता आउलवार, बंटी तनवाणी, कचरू घोडगे व ए. टी. के. शेख हे चार स्वीकृत सदस्य सभागृहात हजर होते. स्वीकृत सदस्यांना मतदानाचा अधिकार नसल्याने त्यांची केवळ उपस्थिती होती. मतदान मात्र 113 सदस्यांनीच केले. जे सदस्य तटस्थ राहिले त्यांच्याकडून तटस्थ राहण्याचे कारण त्यांच्या हस्ताक्षरात लिहून घेण्यात आले.

जल्लोष आणि घोषणाबाजी
महापौर आणि उपमहापौरपदाची निवड जाहीर होताच सभागृहाबाहेर महापालिकेच्या परिसरात व प्रवेशद्वारासमोर फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष करण्यात आला. सर्व विघ्न दूर झाल्याचे मानत महापौरांची निवड जाहीर होताच बॅंण्डपथकाने विघ्नहर्त्याची आरती वाजविली आणि नंतर इतर गाणी वाजवून वातावरण प्रसन्न केले. गुलालाची उधळण केल्याने महापालिकेचा संपूर्ण परिसर भगवा होऊन गेला होता. यानंतर महापौर बापू घडामोडे यांची मोठ्या उत्साहात विजयी मिरवणूक काढण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com