व्यापाऱ्याच्या खून प्रकरणाचा पाच तासांत उलगडा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

आष्टी - जवळ असलेली रोकड व कलिंगडांच्या विक्रीतून येणाऱ्या पैशाच्या हव्यासापोटी मित्राचा काटा काढणाऱ्या चौघांपैकी एकाला आष्टी पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले आहे. अवघ्या पाच तासांत या गुंतागुंतीच्या खून प्रकरणाचा पर्दाफाश झाला आहे.

मालवण (मुंबई) येथील कलिंगड व्यापारी हसन शेख (वय ४६) हे जामखेड व आष्टी येथे माल खरेदी करण्यास आले होते. मात्र, हसन शेख बेपत्ता झाले. तशी फिर्याद पत्नी जैबुन शेख (मालवण, मुंबई) यांनी रविवारी (ता. २७) आष्टी पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी तपास करत खून प्रकरणाचे रहस्य उलगडले. 

हसन शेख हे जामखेड, पाटोदा, आष्टी भागांतून कलिंगड खरेदी करून मुंबईला विक्री करीत. या माध्यमातून त्यांची स्थानिकांची ओळख व मैत्रीही झाली होती. दरम्यान, शुक्रवारी (ता. २५) मुंबईहून ते माल खरेदीसाठी आष्टीत आले. त्यांनी कुसडगाव (ता. जामखेड, जि. नगर) येथील मोहन कुंडलिक भोरे (वय ३०) यांचा दहाचाकी ट्रक (एमएच-४३, वाय-७५९९) भाड्याने घेतला. चालक भोरे व शेख यांनी सुरवातीला पाटोदा, नंतर जामखेडचा माल वाहनात घेतला. सायंकाळी आष्टीतील माल घेऊन ते जामगाव-अरणगावमार्गे जाऊन रात्री साडेबाराच्या सुमारास मिरजगावला जेवणासाठी ढाब्यावर थांबले. पुढे कर्जतमार्गे पुण्याकडे जाण्याचा त्यांचा विचार होता. 

या दरम्यान शेख यांना पारेवाडी (ता. जामखेड) येथील मित्र अक्षय राऊत, चंदन राऊत व अन्य एकजण भेटला. जेवण झाल्यावर सर्वजण ट्रकमध्ये बसून कर्जतमार्गे निघाले. मात्र, शेख यांच्याकडे असलेली वसुलीची रक्कम; तसेच कलिंगड विक्रीतून मोठा पैसा मिळणार असल्याने ट्रकमधील चौघांनी त्यांची हत्या करण्याचा कट रचला. त्यांनी केबिनमध्येच शेख यांना बेदम मारहाण करून ठार मारले. मृतदेह दोरीने बांधून भिगवण परिसरातील एका नदीपात्रात फेकून आरोपी वाहनासह पसार झाले.

शेख परत न आल्याने, तसेच मोबाईलही बंद असल्याने त्यांची पत्नी जैबुन शेख यांनी रविवारी आष्टी पोलिसांत बेपत्ता असल्याची खबर दिली.

त्यानुसार आष्टी पोलिसांत नोंद करण्यात आली. पोलिस निरीक्षक शौकतअली सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे फिरविली असता बेपत्ता शेख यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी ट्रकचालक भोरे यास कवडगाव (ता. जामखेड) येथून जेरबंद केले. तपासाकामी आष्टी पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक मुदस्सर शेख, हेडकॉन्स्टेबल बन्सी जायभाय, कॉन्स्टेबल सोमनाथ गायकवाड, अजित  शिकेतोड, पिंगळे यांनी सहकार्य केले. हा गुन्हा कर्जत हद्दीत घडल्याने भोरेला कर्जत पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. इतर तीन आरोपी फरारी असून, पुढील तपास कर्जत पोलिस करीत आहेत.

Web Title: murder case solve in 5 hrs.