नांदेड - मोहाली - अमृतसर विमानसेवा लवकरच सुरु होणार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 मे 2017

नांदेड : शिखांची दक्षिण काशी म्हणून ओळख असलेले नांदेड शहर श्री गुरू गोविंदसिंगजी यांच्या वास्तव्याने पावन झालेली पवित्र भूमी आहे. येथील सचखंड गुरुद्वाराच्या दर्शनासाठी देश-विदेशातील लाखो शीख भाविक दर्शनासाठी येतात. हे अंतर जास्त असल्याने नांदेड ते मोहाली - अमृतसर अशी विमानसेवा सुरू करावी, अशी मागणी करण्यात येत होती. शनिवारी (ता. २०) केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री पी. अशोक गजपती राजू यांनी नांदेड- मोहाली - अमृतसर विमानसेवा लवकरच सुरू हाेईल, असे जाहीर केल्याने शीख भाविकांत आनंद व्यक्त केला जात आहे.एअर इंडियाची ही सेवा येत्या जुलैमध्ये सुरू हाेईल, असे संकेत मिळाले आहेत.

नांदेड शहराची ओळख जगभर शिखांचे गुरू श्री गुरू गोविंदसिंगजी यांच्या नावाने आहे. सचखंड गुरुद्वाराचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून लाखो शीख भाविक नांदेडला येतात. रेल्वेचे जाळे असल्याने भाविकांना त्याचा फायदा होतो; परंतु दिल्ली, अमृतसर, मोहाली, चंदीगढ या ठिकाणाहून येण्यासाठी फार वेळ लागतो. यासाठी नांदेड ते मोहाली व नांदेड ते अमृतसर अशी विमानसेवा सुरू करावी अशी मागणी आनंदपूर साहिबचे खासदार प्रेमसिंग चंदुमाजरा यांनी लोकसभेत केली होती. अनेकवेळा त्यांनी पी. अशोक गजपती यांना प्रत्यक्ष भेटून निवेदनही दिले होते. यावर गजपती यांनी विचार करून शुक्रवारी (ता. १९) दुपारी एका बैठकीत ही घोषणा केली. मोहाली - नांदेड व अमृतसर - नांदेड ही विमानसेवा येणाऱ्या जुलैमध्ये सुरू करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. एअर इंडिया कंपनीची ही विमानसेवा लवकरच सुरू हाेईल. यामुळे शीख भाविकांना सचखंड गुरुद्वाराचे दर्शन लवकर व सुलभ होणार असल्याने सचखंड गुरुद्वाराच्या वतीनेही या घोषणेचे स्वागत केले आहे. सध्या नांदेड विमानतळावरून उडान योजनेंतर्गत हैदराबादची सेवा सुरू आहे. मुंबईची सेवाही लवकरच सुरू करण्यात येईल, असा विश्‍वासही पी. गजपती यांनी दिल्याचे वृत्त एका वृत्तसेवेने दिले आहे.