अर्थमंत्री, पंतप्रधानांना 'सॅनिटरी पॅड'ची भेट पाठवून "राष्ट्रवादी महिला'तर्फे निषेध

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 जून 2017

नांदेड - युवती व महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे असलेल्या सॅनिटरी नॅपकिन्सला "जीएसटी'तून वगळण्याची मागणी करूनही त्याची दखल न घेतल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे गुरूवारी (ता. 15 ) अर्थमंत्री अरूण जेटली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टपालाने "सॅनिटरी पॅड' पाठवून निषेध व्यक्त करण्यात आल्याचे

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. वाघ म्हणाल्या, 'जीएसटीतून सॅनिटरी पॅड वगळावेत, अशी मागणी आम्ही सरकारकडे वारंवार केली आहे. बेटी बचाओ, बेटी पढाओचे नारे देणारे मोदी सरकारने महिलांच्या आरोग्याचा प्रश्न आला तेव्हा हात आखडता घेतला. यावरून महिलांविषयी त्यांची भूमिका स्पष्ट होते.''