जालना- नगरसोल डेमूला रेल्वे मंत्री व मुख्यमंत्री दाखविणार हिरवी झेंडी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 जून 2017

नांदेड ते पुणे द्वी- साप्ताहिक एक्स्प्रेस गाडीचे ६ डब्बे वाढविणे, औरंगाबाद येथे विविध प्रवासी सुविधेंचे उद्घाटन, मुकुंदवाडी येथील आरक्षण कार्यालयाचे उद्घाटन, आणि जालना ते नगरसोल डेमू गाडीचे साईनगर शिर्डी पर्यंत विस्तारास हिरवी झेंडी दाखविण्याचा कार्यक्रम विडीयो लिंकद्वारे परळीहून केला जाणार आहे

नांदेड - परळी येथून नांदेड विभागातील विविध रेल्वे कामाचे उद्घाटन, राष्ट्रास लोकार्पण तर जालना- नगरसोल डेमू गाडीचा साई नगर शिर्डी पर्यंत विस्तारास हिरवी झेंडी रेल्वे मंत्री सुरेश प्रभु आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखविणार आहेत. शनिवारी (ता. तीन) सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम आयोजित केला आहे.

नांदेड विभागातील विविध कामांचे उद्घाटन होणार आहे. ज्यात नांदेड येथे दोन लिफ्टचे तसेच तिसऱ्या पिट लाईन राष्ट्रास लोकार्पण, नांदेड ते पुणे द्वी- साप्ताहिक एक्स्प्रेस गाडीचे ६ डब्बे वाढविणे, औरंगाबाद येथे विविध प्रवासी सुविधेंचे उद्घाटन, मुकुंदवाडी येथील आरक्षण कार्यालयाचे उद्घाटन, आणि जालना ते नगरसोल डेमू गाडीचे साईनगर शिर्डी पर्यंत विस्तारास हिरवी झेंडी दाखविण्याचा कार्यक्रम विडीयो लिंकद्वारे परळीहून केला जाणार आहे. 

नांदेड आणि औरंगाबाद येथे या कार्यक्रमास मंत्री, खासदार, आमदार आणि विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. 

मराठवाडा

पूर्णा (परभणी): तालुक्यातील बरबडी येथील लक्ष्मण गणेश सोलव या बावीस वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्यांने कर्जबाजारीपणामुळे गळफास घेऊन...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

मराठवाडा जनता विकास परिषदेच्या पाठपुराव्याला यश औरंगाबाद : दमणगंगेचे पन्नास टीएमसी (50 अब्ज घनफुट) पाणी गोदावरी खोऱ्यात सोडून...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

लोहा : बैलगाडा घेऊन शेतीकामाला जात असताना बैलगाडा उलथून झालेल्या अपघातात शेतमजुराचा मृत्यू झाला. ही घटना हिप्परगा गावालगतच्या...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017