नांदेडात फोडल्या सहा बसेस

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 जून 2017

अगोदरच तोट्यात असलेल्या महामंडळास अधिक नुकसान सोसावे लागु नये म्हणून काही महिन्यांपूर्वीच शासनाने स्वतंत्र कायदा केला आहे. त्या नुसार नुकसान करणाऱ्यावर अंकुश लावला बसला आहे. असे असले तरी काही आंदोलन कर्ते किंंवा ज्यांचा आंदोलनाशी काहीच संबंध नाही, असे अनेक जण एसटीची तोडफोड करतांना दिसून येतात

नांदेड - जिल्ह्यात विविध ठिकाणी शेतकऱ्यांचा संप सुरु आहे. या संपात सहभागी आज्ञात आंदोलन कर्तांनकडून महामंडळाच्या सहा बसेसची तोडफोड करण्यात आली असून, यामध्ये एसटीचे ६० हजारापेक्षा जास्तीचे नुकसान झाल्याची माहिती नांदेड एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयाकडून सोमवारी (ता.पाच) देण्यात आली.

सध्या कर्जाच्या माफी साठी शेतकऱ्याचे आंदोलन सुरु आहे. एक जून पासून सुरु झालेल्या आंदोलनाचा सोमवारी (ता. पाच) रोजी पाचवा दिवस उजाडला असून, सरकार कडून शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घेतली जात नसल्याने राज्यातील शेतकऱ्यांनी आंदोलनाची धार अधिक तिव्र केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज्ञात आंदोलन कर्ताकडून सोमवारी असनापुलाजवळील पींपळगाव येथे चार एसटी बसेस, बाळापुरात एक आणि भोकर येथे एका एसटी बसेसची तोडफोड करुन नुकसान केले आहे.
पूर्वी आंदोलनकर्तांना सरकारच्या विरोधात राग व्यक्त करण्याचे एकमेव माध्यम एसटी महामंडळाच्या बसेस होत्या. त्यामुळे कुणीही उठसुट'एसटीचे नुकसान करत होते. अगोदरच तोट्यात असलेल्या महामंडळास अधिक नुकसान सोसावे लागु नये म्हणून काही महिन्यांपूर्वीच शासनाने स्वतंत्र कायदा केला आहे. त्या नुसार नुकसान करणाऱ्यावर अंकुश लावला बसला आहे. असे असले तरी काही आंदोलन कर्ते किंंवा ज्यांचा आंदोलनाशी काहीच संबंध नाही, असे अनेक जण एसटीची तोडफोड करतांना दिसून येतात.

एसटी महामंडळाच्या बसेसचे नुकसान करणाऱ्या आज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या विषयचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांना प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

एसटी बंद ठेवण्याचे प्रयोजन नाही
जिल्ह्यात काही ठिकाणी आदोलन कर्तांकडून महामंडळाच्या बसेसची तोडफोड करण्यात आली आहे. यामध्ये ६० हजारापेक्षाजास्तीचे नुकसान झाले आहे. बस बंदचा महामंडळास फटका बसू नये म्हणून जिथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो तेव्हाच बस बंद ठेवण्यात येतात. पुढील काळात देखील बस बंद ठेवण्याचे कुठलेही प्रयोजन नाही. परंतू एेन वेळी एसटी काही काळासाठी नजिकच्या बस डेपोत लाऊन तात्पुर्ती बंद ठेवण्यात येईल
-पी.एस.नेहूल (विभागीय वाहतूक नियंत्रक अधिकारी, नांदेड)