मागण्या तातडीने मान्य करा, अन्यथा तीव्र आंदोलन- राष्ट्रवादी किसान सभा

जयपाल गायकवाड
शुक्रवार, 2 जून 2017

नांदेड : राज्यातील शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करुन सरकारने शेतकऱ्यांचा संप तातडीने मिटवावा अन्यथा राष्ट्रवादी किसान सभेच्या वतीने आंदोलन करणार असा इशारा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात व पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार शंकरअण्णा धाेंडगे यांनी दिला आहे.
राज्यातील शेतकरी संपावर गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (ता. दोन) राष्ट्रवादी किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष शंकरअण्णा धोंडगे यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेऊन सरकार टिका केली. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना प्रदेशाध्यक्ष धोंडगे म्हणाले, कर्जमाफी, हमीभावची मागणी सर्व राजकीय पक्ष, संघटना करीत आहे. तरीही सरकार दुर्लक्ष करते, शेतकरी संपात होणाऱ्या हिंसमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचा सहभाग नसतानाही राष्ट्रावादी व काॅंग्रेस यांचा हात आहे असे मुख्यमंत्री आरोप करीत आहेत. आम्ही शेतकऱ्यांना फुस लावतोय, आंदोलन करतोय असे मुख्यमंत्रयांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्रयांनी वेळ न घेता एक दोन दिवसात निर्णय घ्यावा. शेतकऱ्याने संप करावा हे एवढे सोपे नाही. लवकरच तोडगा काढला नाहीतर राज्यातला शेतकरी लवकरच कायदा भंग व हिंसक वळण लागेल सांगितले.

मागील दोन वर्षापासून राज्यातील शेतकरी दुष्काळ, सरकारच्या शेतमाल भाव व आयात निर्यात धोरणामुळे कधी नव्हे एवढा अडचणीत आला असून राज्यातील सर्व संघटना राजकीय पक्ष सनदशीर मार्गाने मागण्या सरकारकडे करीत असताना व न्यायालयही सकारात्मक असताना जाणीवपुर्वक सरकारकडून दिशाभूल करुन चालढकल पणा चालु असल्याने आज राज्यातील शेतकरी संपावर जाऊन आंदोलन करीत आहे. राष्ट्रवादी किसान सभा येतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या मागण्याबाबत आग्रही असून सरकारकडून तातडीने मागण्या मान्य करुन शेतकऱ्यांना दिलासा देऊन संप मिटवावा अशी सरकारकड मागणी केली आहे. तसेच येत्या दाेन दिवसात कोणतीही भूमिका घेतली नाही तर आम्हालाही आंदोलनाची भूमीका घ्यावी लागेल असे प्रदेशाध्यक्ष धोंडगे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.