नांदेड जिल्ह्यात अल्पवयीन युवतीचे अपहरण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 जून 2017

नांदेड: एका अल्पवयीन युवतीस लग्नाचे आमिष दाखवून तिचे अपहरण करणाऱ्या युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर युवतीचे अपहरण गुरूवारी (ता. 22) दुपारी करण्यात आले.

मुखेड तालुक्यातील हातराळ येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन युवती सोबत त्याच गावात राहणाऱ्या एका युवकाचे प्रेमसुत जुळले. त्यातूनच त्याने तिच्याशी लग्न करण्याचे आमिष दाखविले. गुरूवारी (ता. 22) दुपारी तिच्या राहत्या घरुन अपहरण केले. ही बाब तिच्या पालकांना समजल्यानंतर त्यांनी सदरील युवकाविरूद्ध मुक्रमाबाद पोलिस ठाण्यात तक्रार दिली. यावरून पोलिसांनी संबंधित युवकावर अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक कराड करीत आहेत.

टॅग्स