नांदेड: महिनाभराच्या उघडिपीनंतर पावसाची रिपरिप

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 ऑगस्ट 2017

निंदण-खुरपण, फवारणी शेतकऱ्यांच्या अंगलट
मूग, उडीद, साेयाबीन, तुरीचा प्रामुख्याने पेरा असलेल्या शेतकऱ्यांनी थाेड्याफार पावसाने उगवलेल्या पिकाची आंतरमशागत करण्यासाठी एक-दाेन दुंडे झाल्यानंतर निंदण, खुरपण करत अळ्या व किड्यांचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी महागडी फवारणी केली. मात्र गेली महिनाभर पावसाने दिलेल्या प्रदीर्घ उघडीपीमुळे शेतकऱ्यांचा सगळा खर्च अनाठायी, व्यर्थ गेला असून डाेळ्यादेखत पिके करपत असल्याचे पाहून शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.

मुखेड (नांदेड) : भर पावसाळ्यात तब्बल महिनाभराच्या प्रदीर्घ उघडिपीनंतर रविवारी (ता. १३) सायंकाळी मुखेड शहर व परिसरात पंधरा-वीस मिनिटे पावसाची रिपरिप झाल्यामुळे वातावरणात थंडावा निर्माण झाला. तर शेवटच्या टप्प्यात सुकलेल्या पिकांना थाेडेफार पाणी मिळाल्याने पिकांवर तेज येण्याएेवजी गरमीमुळे पिके करपली जात आहेत. यामुळे शेतकरी त्रस्त झाल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे.

यंदा पावसाची सरासरी अधिक असल्याचे हवामान खात्याने अंदाज व्यक्त केल्याने मृगानंतर झालेल्या थाेड्याफार पावसामध्ये बहुतांशी शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या हाेत्या. मधल्या काळात पाच-दहा मिनिटे तुरळक पाऊस वगळता पावसाने माेठी आेढ दिली हाेती. परिणामी दाेन महिन्यांचे पीक असलेल्या मूग - उडीद पिकांची वाढ खुंटली व शेवटच्या टप्प्यात पिके करपून जात असतानाच रविवारी पंधरा वीस मिनिटे चांगला पाऊस झाला. यामुळे पिकांना तेज येण्याएेवजी जमिनीतील गरमीमुळे पिके पुन्हा काेमेजून जात आहेत. तसेच इतर पिकांना वेळेवर पाणी न मिळाल्यामुळे तूर, साेयाबीनची पिकेही शेवटच्या घटका माेजत असल्याचे दिसत आहे.

निंदण-खुरपण, फवारणी शेतकऱ्यांच्या अंगलट
मूग, उडीद, साेयाबीन, तुरीचा प्रामुख्याने पेरा असलेल्या शेतकऱ्यांनी थाेड्याफार पावसाने उगवलेल्या पिकाची आंतरमशागत करण्यासाठी एक-दाेन दुंडे झाल्यानंतर निंदण, खुरपण करत अळ्या व किड्यांचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी महागडी फवारणी केली. मात्र गेली महिनाभर पावसाने दिलेल्या प्रदीर्घ उघडीपीमुळे शेतकऱ्यांचा सगळा खर्च अनाठायी, व्यर्थ गेला असून डाेळ्यादेखत पिके करपत असल्याचे पाहून शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. खत बियाण्यांचा खर्च, निंदण-खुरपणे, फवारणी आदींचा खर्च करूनही हातात काहीच नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले असून शासनाकडून तत्काळ शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करत हेक्टरी २५ हजारांची मदत जाहीर करावी, अशी मागणी जनतेतून केली जात आहे.

Web Title: Nanded news rain in mukhed