नवोदित अभिनेत्री अपघातात मृत्युमुखी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 जून 2017

निलंगा - तालुक्‍यात गेल्या 18 दिवसांपासून चित्रीकरण होत असलेल्या मराठी चित्रपटातील नवोदित नायिका अस्मिता मुकुंद मोरे (वय 17) हिचा गुरुवारी पहाटे मोटार अपघातामध्ये मृत्यू झाला.

निलंगा - तालुक्‍यात गेल्या 18 दिवसांपासून चित्रीकरण होत असलेल्या मराठी चित्रपटातील नवोदित नायिका अस्मिता मुकुंद मोरे (वय 17) हिचा गुरुवारी पहाटे मोटार अपघातामध्ये मृत्यू झाला.

'पेटले मन सारे' या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण आटोपून निलंग्याकडे येत असताना मोटार टायर फुटून दुभाजकावर आदळली. यात अस्मिताचा जागीच मृत्यू झाला, तर मोटारचालक व तिचा मावसभाऊ सुदर्शन कदम हा एअर बॅगमुळे बचावला. अस्मिताचा हा पहिलाच मराठी चित्रपट होता. तिचे वडील महाराष्ट्र महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. भालकीजवळील अहमदाबाद येथे मूळ गावी तिच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. निलंगा पोलिस ठाण्यात या अपघाताबाबत गुन्हा दाखल करण्यात आला.