सातबारा उतारे ऑनलाईन करण्याच्या कामाला वेग

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 सप्टेंबर 2016

उस्मानाबाद - तालुक्‍यातील सातबारा उतारे ऑनलाईन करण्याचे काम वेगात सुरू झाले आहे. नऊ गावांतील सातबारा उताऱ्याचा डेटा तपासून पूर्ण झाला असल्याची माहिती तहसील कार्यालयातून देण्यात आली आहे.

उस्मानाबाद - तालुक्‍यातील सातबारा उतारे ऑनलाईन करण्याचे काम वेगात सुरू झाले आहे. नऊ गावांतील सातबारा उताऱ्याचा डेटा तपासून पूर्ण झाला असल्याची माहिती तहसील कार्यालयातून देण्यात आली आहे.

नागरिकांना ऑनलाईन सातबारा उतारा पाहता यावा, महसूल कार्यालयातील कामे वेगाने व्हावीत, यासाठी ऑनलाईन सातबारा उतारे करण्याचे काम सुरू झाले आहे. सातबारा उतारे ऑनलाईन नसल्याने एकाच शेताची तीन-तीन वेळा विक्री केल्याची प्रकरणे सध्या विविध न्यायालयांमध्ये प्रलंबित आहेत. अशा शेतविक्रीची प्रकरणे वारंवार घडत आहेत. शासकीय स्तरावरही अशा प्रकरणांचा निकाल त्वरित होत नाही. असे प्रकार पुन्हा होऊ नयेत, यासाठी ऑनलाईन सातबारा उतारे करावे लागणार आहेत. कोणत्याही खरेदीखताच्या प्रकरणात ऑनलाईन सातबारा उतारा वापरला जाणार आहे. तालुक्‍यात १२८ गावे आहेत. यामध्ये ५० हजार १९९ सातबारा उतारे आहेत. आतापर्यंत नऊ गावांतील सातबारा उतारे तपासणीचे काम पूर्ण झाले आहे. यात ११ हजार ६४३ साताबारा उतारे तपासणीचे काम पूर्ण झाले आहे. यामध्ये प्रथम तलाठी स्तरावर तपासणी केली जाते. त्यानंतर मंडळ स्तरावर तपासणी करून तहसीलदारांनी तपासणी केल्यानंतर ऑनलाईनची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. तहसील कार्यालयात सातबारा उताऱ्याचे दप्तर तपासणी काम वेगाने सुरू असल्याची माहिती तहसील कार्यालयातून देण्यात आली आहे.

मराठवाडा

कसबे तडवळे - शेतकऱ्यांसाठी 30 जून 2016 ची कर्जमाफीसाठी असलेली थकबाकीची अट रद्द करुन शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी. 10...

12.33 PM

औरंगाबाद - पोलिसांनी ऑल आऊट ऑपरेशनमध्ये शहरात अनेकांची झाडाझडती घेतली. यावेळी विविध गुन्हेगारांच्या मुसक्‍या आवळल्या, बेशिस्त...

08.42 AM

औरंगाबाद - तमिळनाडूतील दोघांनी शहरातील एका कंपनीला कापसाच्या गाठींची ऑर्डर दिली. त्यानंतर कंपनीने पाठविलेल्या कापसाच्या शंभर...

08.42 AM