ऑनलाइन सातबाऱ्यातील त्रुटींमुळे रजिस्ट्रीला ब्रेक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 ऑगस्ट 2016

सातबारा ऑनलाइनची प्रक्रिया पूर्ण करून सर्व रेकॉर्ड अपलोड केल्याचे पत्र महसूल विभागाने भूमी अभिलेख कार्यालयाच्या आयुक्‍तांना दिले आहे. आयुक्‍तांनी ऑनलाइन सातबारा पाहिल्याशिवाय रजिस्ट्री न करण्याचे आदेश काढले आहेत. प्रत्यक्षात रजिस्ट्री करताना काही सातबाऱ्यांमध्ये त्रुटी आढळून येत आहेत. अशा वेळी तहसील कार्यालयातून त्या चुका दुरुस्त करून आणण्याचे सांगितले जाते. रजिस्ट्रीसाठी स्टॅम्प ड्यूटीपोटी शुल्क भरल्यानंतर संबंधिताला पुढील चार महिन्यांपर्यंत रजिस्ट्री करता येते. त्यामुळे त्याचे पैसे वाया जात नाहीत. ऑनलाइन सातबाऱ्याच्या प्रक्रियेमुळे परस्पर खरेदी-विक्रीला आळा बसला आहे.
- ए. यू. कोळेकर, मुद्रांक जिल्हाधिकारी.

औरंगाबाद - अचूक ऑनलाइन सातबारा असल्याशिवाय रजिस्ट्री न करण्याचे आदेश वरिष्ठांकडून आल्याने गेल्या काही दिवसांपासून नागरिकांसाठी रजिस्ट्री करणे डोकेदुखी ठरत आहे. ऑनलाइन सातबाऱ्यातील त्रुटींमुळे अनेकांना तहसील कार्यालय, तलाठ्याकडे चकरा मारण्याची वेळ आली आहे. तलाठी व महसूल अधिकाऱ्यांच्या अनागोंदी कारभाराचा फटका मात्र नागरिकांना बसत आहे.

जमीन, प्लॉट खरेदी-विक्रीतील परस्पर होणाऱ्या व्यवहारांवर अंकुश ठेवण्यासाठी, तलाठ्यांकडून शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांची होणारी लूट व अडवणूक थांबविण्यासाठी शासनाने ऑनलाइन सातबारा प्रक्रिया राबवली. जिल्ह्यासह राज्यभरात सर्व गटांतील, खातेदारांचे सातबारे ऑनलाइन अपलोड करण्यात आले. मात्र, शासनाला काम फत्ते झाल्याचा अहवाल पाठवण्याच्या घाईत तलाठी व तहसील कार्यालयाने अनेक त्रुटी तशाच कायम ठेवल्या आहेत. असे असतानाही तहसीलदार, उपविभागीय अधिकाऱ्यांनी सर्व सातबारे ऑनलाइन केल्याचा अहवाल देऊन टाकला. अद्यापही खातेदाराचे नाव, क्षेत्र यासह विविध त्रुटी सातबाऱ्यामध्ये आहेत.

रजिस्ट्री कार्यालयाशी हे सातबारे ऑनलाइन जोडण्यात आले आहेत. खरेदी-विक्री व्यवहार झाल्यानंतर रजिस्ट्री करण्यासाठी गेल्यानंतर संबंधितांचा सातबारा ऑनलाइन पाहिला जातो. त्यात नाव, इतर त्रुटी आढळल्यास पुढील प्रक्रिया उपनिबंधकांमार्फत तत्काळ थांबवली जाते. त्यामुळे रजिस्ट्री होत नाही. सातबाऱ्यातील चूक दुरुस्त करून आणण्यासाठी संबंधित तहसील कार्यालय व तलाठ्याच्या पाठीमागे धावावे लागत आहे. यामुळे नागरिकांची हेळसांड सुरू आहे.

बीड बायच्या कार्यालयात होतेय सर्रास रजिस्ट्री
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील रजिस्ट्री कार्यालयात तीन उपनिबंधकांकडे रजिस्ट्री होते. या तिन्ही कार्यालयांतील उपनिबंधकांकडून ऑनलाइन सातबाऱ्याशिवाय रजिस्ट्री न करण्याच्या आदेशाचे पालन होत आहे. बीड बायपासवरील कार्यालयात मात्र या आदेशाला कचरापेटीत टाकून सर्रास रजिस्ट्री होत असल्याचा आरोप होत आहे.

 

मराठवाडा

नांदेड : दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर शनिवारी (ता.१९) रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरातील सर्वच रस्ते जलमय झाले. तसेच...

रविवार, 20 ऑगस्ट 2017

माहूर : महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या माहूरगडावरिल श्री रेणुकादेवी संस्थानतर्फे श्रावणमास...

रविवार, 20 ऑगस्ट 2017

पूर्णा : तालुक्यात दोन महिन्याच्या प्रतिक्षेनंतर वरूनराजाचे दमदार आगमन झाले आहे. अतीवृष्टीने तालुक्यातील धानोरा काळे येथील...

रविवार, 20 ऑगस्ट 2017