नळदुर्गचे नर मादी धबधबे खुणावतायत पर्यटकांना

भगवंत सुरवसे
रविवार, 8 ऑक्टोबर 2017

चिकंद्रा, होर्टी, गंधोरा, या ठिकाणचे साठवण तलाव भरल्यानंतरच कुरनूर (बोरी) धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली

नळदुर्ग (जि.उस्मानाबाद) : महाराष्ट्रातील असंख्य पर्यटकांचे आकर्षण असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग (ता. तुळजापूर) येथील भुईकोट किल्यातील मुख्य नर व मादी हे दोन्ही धबधबे रविवार (ता.८) रोजी पहाटेपासून वाहू लागल्यामुळे पर्यटकांची प्रतीक्षा संपली आहे. यापूर्वीच २९ ऑगस्ट रोजी मादी हा कमी उंचीवर आसलेला धबधबा सुरू झाला होता. मात्र दोन्ही धबधबे सुरू होण्यासाठी नळदुर्गच्या उत्तरेस असलेल्या बोरी धरणाच्या सांडव्यातून पाणी वाहणे गरजेचे होते. रविवार हा सुट्टीचा असल्यामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करण्याची शक्यता असते.

जूनमध्ये झालेल्या चांगल्या पावसानंतर तब्बल दीड महिना पाऊस न झाल्यामुळे पर्यटकांमध्ये धबधबा चालू होण्यासंबधी सांशकता होती. मात्र ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात चांगला पाऊस झाल्यामुळे पर्यटकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. त्यावेळी मादी धबधबा काही काळ चालू होता.

दरम्यान बोरी धरणाच्या वरील भागातील अनुक्रमे चिकंद्रा, होर्टी , गंधोरा, या ठिकाणचे साठवण तलाव भरल्यानंतरच कुरनूर (बोरी) धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली होती आणि मंगळवारी (ता.३) रोजी बोरी धरण शंभर टक्के भरले. आता दोन्ही धबधबे सुरु होतील म्हणून तेंव्हापासूनच पर्यटकांनी नळदुर्ग किल्ला पाहण्यासाठी गर्दी केली आहे आता त्यात वाढ होईल.

 

Web Title: osmanabad news naldurg fort tourism waterfalls flow