'चौदा वर्षांपासून आठवड्याची पायी वारी करणारा देवी भक्त'

सदाशिव रामचंद्र साळुंके
सदाशिव रामचंद्र साळुंके

आत्तापर्यंत झाला पन्नास हजार किलोमीटर अंतराचा प्रवास

उमरगा : दर आठवड्याला ७५ किलोमिटर अंतर अनवानी पायाने प्रवास करून तुळजाभवानी मातेच्या मंगळवारचे दर्शन करणार्‍या सदाशिव रामचंद्र साळुंके यांनी सलग चौदाव्या वर्षीही वारी सुरू ठेवली आहे. भवानी मातेवर अपार श्रद्धा असलेल्या सदाशिव यांनी आतापर्यंत जवळपास पन्नास हजार किलोमीटर अंतर पायी प्रवास करून निस्वार्थ भक्तीचे आदर्श उदाहरण घालून दिले आहे.

उमरगा (जि. उस्मानाबाद) येथील रहिवाशी असलेला ४५ वर्षीय तरूण तूळजाभवानी मातेचा भक्त आहे. संसार, व्यापार हा जीवन जगण्याचा आधार असला तरी अध्यात्मानाने मिळणारे आत्मिक समाधान लाख मोलाचे असतात, या भावनेतून सहाशिव हा वयाच्या दहाव्या वर्षापासून कुटुंबासह दरवर्षी नवरात्रात दर्शनासाठी जायचा. भवानी मातेच्या भक्तीचा लळा वाढत गेला आणि सदाशिवने वयाच्या ३२ व्या वर्षापासून उमरग्याहून तूळजापूरला दर्शनासाठी पायी जाण्याचा दृढ निश्वय केला. ऑगस्ट २००४ पासून दर आठवड्याच्या मंगळवारच्या दर्शनासाठी त्याने पायी वारी सुरू केली. मंगळवारी दुपारी साडेतीन ते चार या वेळेत भवानी मातेच्या दरबारात पोहचण्याच्या दृष्टीने वेळापत्रक निश्चित केले.

सोमवारी सकाळी आठ वाजता ते घरातून निघतो, ग्रामदैवत महादेवाचे दर्शन घेऊन ते पायी वारीला सुरुवात करतात. रात्री साधारणतः दहाच्या सुमारास नळदूर्ग-तूळजापूर मार्गावरील गंधोरा शिवारातील पाण्याच्या टाकीजवळ मूक्काम करतात. मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास तूळजापूरकडे मार्गस्थ होतात. दुपारी चारच्या सुमारास मंदिरात पोहचल्यानंतर तिर्थकुंडात स्नान करून दर्शनरांगेत थांबून तूळजाभवानी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन मंदिरात अकरा प्रदक्षिणा पूर्ण करतात. इतर देव कार्याच्या विधी पूर्ण केल्यानंतर थोडा विसावा घेतात. भवानी मातेच्या छबीना, आरती झाल्यानंतर रात्री साडेबारा वाजता देवीचा दरवाजा बंद झाल्यानंतर रात्री उशीरा मिळेल त्या वहानाने घराकडे परततात. गेल्या तेरा वर्षात सदाशिवने वारीत कधीही खंड पडू दिला नाही. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या ऋतूतील नैसर्गिक वातावरणाशी मेळ घालत त्यांनी वारीच्या चौदाव्या वर्षांत पदार्पण केले आहे.

थेट दर्शनासाठी कधीही आग्रह धरला नाही !
भक्ती ही कोणाला सांगून करायची नसते. अशी मनाशी खूनगाठ बांधून पायी वारी करणाऱ्या सदाशिवने थेट दर्शनासाठी कधीही आग्रह धरला नाही. तुळजाभवानी मंदिर समिती संस्थानच्या काही पदाधिकाऱ्यांना सदाशिवच्या नियमित वारीची कल्पना आहे. मात्र, समितीने सदाशिवचा सत्कार करायचे ठरवले नाही; सदाशिवला ते नकोही आहे. अंतरात्मातील भक्तीच समाधान देऊन जाते, असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com