पाऊस दिंडीत यात्रेकरूंनी केली बियांची पेरणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

दिंडीच्या समारोप प्रसंगी जेष्ठ पत्रकार शंतनु डोईफोडे व प्रा. उमाकांत जोशी यांच्या हस्ते 2 जुलैला अमरनाथला जाणाऱ्या यात्रेकरूंना रेनकोट, जर्सी व टोपीचे वितरण करण्यात आले. भाऊ स्टील होम तर्फे प्रवासात उपयोगी पडणाऱ्या वस्तू देण्यात आल्या.

नांदेड : अमरनाथ यात्री संघाच्या वतीने नादेंड ते रत्नेश्वरी पाऊस दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पाऊस दिंडीत सहभागी यात्रेकरूंनी हजारो बियांची पेरणी केली. आणि शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येऊ नये म्हणून निसर्गासह रत्नेश्वरी व अन्नपूर्णा मातेकडे साकडे घातले.

धर्मभूषण अॅड. दिलीप ठाकूर यांनी आयोजीत केलेल्या या दिंडीचे उद्‍घाटन वन अधिकारी प्रवीण डोंगरखेडकर यांच्या हस्ते झाले. या वेळी जेष्ठ समाजसेवक वसंत मैया, विजय होकर्णे यांची प्रमुख उपस्थिती होती. महाराष्ट्र शासनाच्या चार कोटी वृक्ष लागवड मोहीमेअंतर्गत १३ किलोमिटर अंतरावरील रस्ताच्या दुतर्फा सिताफळ, लिंबोळी, खैर, बांबूच्या हजारो बियांची पेरणी करण्यात आली.

कैलास महाराज वैष्णव, भाजप जिल्हाध्यक्ष डाॅ. संतुकराव हंबर्डे, नंदिग्राम भूषण माधवराव झरीकर, सचिन शिवपुजे, जितेंद्र भयानी यांच्यातर्फे जागोजागी चहा फराळाची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली. दिंडीच्या समारोप प्रसंगी जेष्ठ पत्रकार शंतनु डोईफोडे व प्रा. उमाकांत जोशी यांच्या हस्ते (ता.दोन) जुलै ला अमरनाथला जाणाऱ्या यात्रेकरूंना रेनकोट, जर्सी व टोपीचे वितरण करण्यात आले. भाऊ स्टील होम तर्फे प्रवासात उपयोगी पडणाऱ्या वस्तू देण्यात आल्या. पाऊस दिंडीत अॅड. प्रकाश तळेगावकर, रंगराव पांडे, राजेश्वर बिडवई, विजयसिंह बिसेन गोविंदराव सोनटक्के, डाॅ. बाळकृष्ण जोशी, भास्कर रायपत्रेवार, भगवानदास आसवा, प्रशांत तातोडे, महेश तांडूरवार, शंकर सिरपल्ली प्रा. नंदकुमार मेगदे, व्दारकादास अग्रवाल, तुकाराम कोतेपल्लु, गोपाळराव सिंगणवाड यांच्यासह तिनशे-साडेतिनशे भाविक सहभागी झाले होते.