पंकजांना परळीकरांचा झटका

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

परळीत भाजपने अर्धे मंत्रिमंडळ कामाला लावले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अनेक भाजप नेते सभांना आले होते. पण, जनता काम करणाऱ्याच्या पाठीमागे उभी राहते. राष्ट्रवादी काँग्रेस एकाकीपणे लढली. तर दुसरीकडे भाजप धनशक्तीला घेऊन सर्व पक्ष एकत्र आले होते.

परळी - महाराष्ट्रातील आघाडीच्या मंत्री पंकजा मुंडे यांना घरच्याच मतदारांनी झटका दिला आहे. बीड जिल्ह्यातील महत्वपूर्ण परळी नगरपालिकेत मुंडे यांचे कट्टर राजकीय विरोधक, विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची सत्तेच्यादिशेने आगेकूच सुरू आहे. 

परळी नगरपालिकेची निवडणूक राज्यात चुरशीची मानली गेली होती. निवडणुकीच्या आधी भगवान गड उत्सवावरून मुंडे बहिण-भावंडात उफाळलेला राजकीय संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिला होता. नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होतानाच धनंजय मुंडे यांचे वडील पंडितअण्णा मुंडे यांचे निधन झाले होते. त्यानंतरही मुंडे बहिणी-भावंडांमधील संघर्ष संपुष्टात आला नव्हता.

भाजपच्या धनशक्तीचा पराभव - धनंजय मुंडे
परळी नगरपालिकेत भाजपने धनशक्तीचा वापर करून राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात सर्व पक्षांना एकत्र आणले. अगदी काँग्रेसमधील एक गटही त्यांनी फोडला. पण, परळीतील जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसवर विश्वास ठेवून त्यांच्याबाजूने कौल दिला, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी सांगितले.

धनंजय मुंडे म्हणाले, की परळीत भाजपने अर्धे मंत्रिमंडळ कामाला लावले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अनेक भाजप नेते सभांना आले होते. पण, जनता काम करणाऱ्याच्या पाठीमागे उभी राहते. राष्ट्रवादी काँग्रेस एकाकीपणे लढली. तर दुसरीकडे भाजप धनशक्तीला घेऊन सर्व पक्ष एकत्र आले होते. परळीच्या जनतेच्या राष्ट्रवादीच्या बाजूने कौल दिला आहे. परळीच्या विकासासाठी राष्ट्रवादीला पाठिंबा दिला आहे.

मराठवाडा

औरंगाबाद - अनधिकृत धार्मिक स्थळांच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिका बुधवारी (ता. २३) सुनावणीस...

10.36 AM

कोणाच्या प्लॉटची, कोणाच्या कंपनीची सोय झाल्याचा आरोप    नव्याने सर्वेक्षण करून रस्ते निवडण्याचे आदेश स्थायी समिती...

10.36 AM

औरंगाबाद - शहरातील पाणीपुरवठा गेल्या आठ दिवसांपासून विस्कळित झाला असून, बुधवारी (ता. २३) स्थायी समितीच्या बैठकीतही याचे पडसाद...

10.36 AM