जशोदाबेन मोदी स्वातंत्र्यदिनी परंड्यात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

परंडा (जि. उस्मानाबाद) - आगामी स्वातंत्र्यदिनाला देऊळगाव (ता. परंडा) येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी उपस्थित राहणार आहेत. श्रीमती मोदी यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मंगळवारी (ता. 15) ध्वजवंदन होणार आहे.

देऊळगावची जिल्हा परिषद शाळा गेल्या काही दिवसांपासून प्रयोगशील उपक्रम राबवत आहे. 17 सप्टेंबर 2016 च्या मराठवाडा मुक्तीदिनानिमित्त शाळेने "एकच संकल्प सव्वाशे करोड' असा उपक्रम सुरू केला आहे. "प्रत्येकी एक रुपया शिक्षणासाठी' हा उपक्रम हाती घेतला आहे. हा उपक्रम देशभरात पोचवण्याचा प्रयत्न शाळेने सुरू केला असून, त्याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी ध्वजवंदन केले जाणार आहे. शाळेच्या संकेतस्थळाचे उद्‌घाटन व वृक्षारोपणाचा कार्यक्रमही यावेळी होईल. या कार्यक्रमासाठी आदर्शगाव संकल्प आणि प्रकल्प समितीचे पोपटराव पवार, अशोक मोदी, कमलेश मोदी आदी उपस्थित राहणार आहेत.