परभणी: दूबार पेरणीच्या संकटाने युवकाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जुलै 2017

सेलु तालुक्यातील चिकलठाणा ( खुर्द ) येथील घटना

सेलू (परभणी): तालूक्यातील चिकलठाणा (खुर्द) येथील एका युवकाने दूबार पेरणीचे संकट व बँकेचे घेतलेले कर्ज कसे फेडायचे या विवेंचनेतून गुरूवारी (ता. १३) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास स्वत:च्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेचे नोंद सेलू पोलिस ठाण्यात झाली.

घटनेचे सविस्तर वृत्त असे की, तालूक्यातील चिकलठाणा (खुर्द) येथील रहिवाशी युवक योगेश बालासाहेब थोंबाळ (वय २०) याने पावसाअभावी शेतात पेरणी केलेले बीयाने वाया गेले. त्यामुळे दूबार पेरणीचे संकट व मोरेगाव (ता. सेलू ) येथील जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेचे कर्ज तसेच सेलू येथिल स्टेट बॅक ऑफ हैद्राबाद शाखेचे घेतलेले कर्ज कसे फेडायचे या विवेंचनेतून गुरूवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास स्वत:च्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. मुलगा शेतातून घरी परतला नाही म्हणून घरातील मंडळीने योगेशचा शोध घेण्यास सुरूवात केली. त्यांना राञी अकराच्या सुमारास शेतातील लिंबाच्या झाडाला त्याचा मृतदेह लटकलेल्या आवस्थेत आढळून आला. त्याचा मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी सेलू येथील उपजिल्हा रूग्णालयात आणण्यात आला. डॉक्टर मस्के यांनी त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर त्याचा मृतदेह त्याच्या कुटूंबियाच्या स्वाधिन केला.

दरम्यान, घटनेचा पूढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार अविनाश बनाटे, संजय जाधव हे करीत आहेत.

ई सकाळवरील आणखी बातम्या : 
काश्‍मीरप्रश्‍नी मध्यस्थी नको- चीनला भारताचा इशारा
अडीच वर्षांच्या अवीर जाधवचा नवा विक्रम
बाणेर-हिंजवडी रस्त्यास शेतकऱ्यांचा विरोध
पंतप्रधानांनी हिटलरचा मार्ग पत्करावा - संजय राऊत
कर्नाटकमध्ये पेट्रोल सव्वाआठ रुपये स्वस्त

टॅग्स