परभणीत मराठा समाजाने काढली भव्य दुचाकी रॅली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

मुंबईत निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाची जनजागृती केली

परभणीः परभणीत आज (शुक्रवार) मराठा समाजाने भव्य दुचाकी रॅली काढुन मुंबईचा मोर्चा कसा राहील याची एक झलक दाखवुन दिली आहे. अत्यंत शिस्तीत निघालेली रॅली ही परभणीकरांसाठी ऐतीहासीक अशी ठरली आहे. रॅलीच्या निमीत्ताने अवघे शहर भगवेमय झाले होते.

मुंबईत निघणाऱ्या नऊ ऑगस्टच्या मोर्चासाठी परभणीत मराठा समाजाने आज दुचाकी रॅली काढुन मोर्चाची झलक दाखविली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन ही रॅली सकाळी 10 स्टेशन रोडने निघाली. बसस्थानक, उड्डानपुल, जिल्हा परिषद मार्गे विसावा फाटा येथे गेली. तेथून वळसा घेत जिल्हा शासकीय रुग्णालय, शिवाजी चौक, गांधीपार्क, नारायण चाळ, विसावा कॉर्नर मार्गे परत पुतळा येथून वसमत रोडने जात शिवाजी महाविद्यालय मार्गे संत तुकाराम महाविद्यालयाच्या मैदानावर रॅलीचा समारोप करण्यात आला. शह रातील मोठ्या मैदानापैकी एक असेलले संत तुकाराम महाविद्यालयाचे मैदान दुचाकी वाहनांनी गच्च भरले होते. वाहनांना भगवे झेंडे, स्टिकर लावल्याने संपूर्ण परिसर भगवामय झाला होता. जय जिजाऊ, जय शिवराय अशा गगणभेदी घोषणादेत अत्यंत शिस्तीत ही रॅली निघाली.