पावसासाठी पर्जन्य यज्ञ करा- शंकराचार्य

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 जून 2016

औरंगाबाद- राज्यातील दुष्काळी परिस्थितीनंतर पाऊस लांबल्याने नागरिकांच्या चिंतेत दिवसेंदिवस भर पडत असून, पाऊस हवा असेल तर सरकारने पर्जन्य यज्ञ करावा, असा सल्ला शंकराचार्य नृसिंह भारती यांनी दिला आहे.

भारतीय जनता पक्षाचे (भाजप) दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त येथे संत परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना शंकराचार्य नृसिंह भारती म्हणाले, ‘राज्यातील जलयुक्त शिवाराची कामे चांगली झाली आहेत. परंतु, पाऊस पडत नसल्यामुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडत आहे. यामुळे सरकारने पर्जन्य यज्ञ केल्यास पाऊस पडेल.

दरम्यान, यावेळी व्यासपीठावर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह पक्षाच्या अन्य नेत्यांसह राज्यातील वारकरी समुदायही उपस्थित होता.