पाथरी तालुक्‍यात मजुराची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

पाथरी - तालुक्‍यातील कानसूर येथील एका 40 वर्षीय सालगड्याने आर्थिक विवंचनेतून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (ता. तीन) घडली. परतूर (जि. जालना) तालुक्‍यातील सातोना येथील रहिवासी नारायण मल्हारी गवारे हे पाथरी तालुक्‍यातील कानसूर येथील गोकुळ शिंदे यांच्या शेतात सालगडी म्हणून कामाला होते. त्यांना दोन मुले व दोन मुली आहेत. त्यापैकी एका मुलीचे लग्न उसनवारीचे पैसे घेऊन केले होते.

सातोना येथील जागा विकून खासगी पैसे देण्याचा त्यांचा विचार होता; पण ती विकली जात नसल्याने ते आर्थिक अडचणीत होते. याच विवंचनेत त्यांनी शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.