झाडे लावतानाच ती जगविण्याचे नियोजन करा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 सप्टेंबर 2016

औरंगाबाद - ""सध्या वृक्षलागवडीचा मोठा उपक्रम राज्यात सुरू आहे. विविध संस्थाही वृक्षलागवड करीत आहेत; पण लावलेली झाडे जगविली पाहिजेत. झाडे लावतानाच ती जगविण्याचे नियोजन करावे,‘‘ असे प्रतिपादन राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी शनिवारी (ता. 17) केले. 

सातारा टेकडीवर झालेल्या वृक्षारोपण कार्यक्रमाला खासदार चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, आमदार संजय शिरसाट, महापौर त्र्यंबक तुपे उपस्थित होते. 

श्री. कदम म्हणाले, ""झाडे जगविली, वाढविली तरच पाऊस पडणार आहे. पर्यावरण संतुलन राहणार आहे. फक्त छायाचित्र काढण्यापुरते वृक्षारोपण नको, झाडे जिवंत राहिली पाहिजेत. वृक्षारोपण हे सामाजिक कार्य आहे. "झाडे लावा, झाडे जगवा‘ हे ब्रीद घेऊन जनतेने वृक्षलागवडीचा कार्यक्रम हाती घ्यावा. सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचा आदर्श इतर शिक्षण संस्थांनीही घ्यावा. सातारा टेकडीवरील वृक्षारोपणाची व झाडे जगविण्याची जबाबदारीही या संस्थेने घेतली आहे. त्यासाठी या संस्थेस आपण सर्वतोपरी सहकार्य करू.‘‘
 
सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिनकर बोरीकर, सरचिटणीस दिनेश वकील गंगापूरवाला यांनीही मनोगत व्यक्त केले. या सातारा टेकडीवर पाच हजार झाडांची लागवड केली जाणार आहेत. यात औषधी वनस्पतींचाही समावेश राहणार आहे. या ठिकाणी लागवडीबरोबरच वृक्षसंवर्धन केले जाणार आहे.
कार्यक्रमास महापालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते. डॉ. प्रा. आनंद चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य जे. एस. खैरनार यांनी आभार मानले. 

मराठवाडा

ढोरसांगवी येथील घिसाडी कुटुंबाला नाही घर, नाही शेती जळकोट - ढोरसांगवी (ता. जळकोट) येथे घिसाडी समाजाचे एक कुटुंब मागील पंधरा...

01.18 PM

औरंगाबाद - ‘‘शेतकऱ्यांचे कर्ज माफ व्हावे, अशी मागणी सर्वच पक्षांनी केली होती. त्यासाठी शेतकऱ्यांनी संपही केला. त्या आधारे राज्य...

01.18 PM

११ हजार खड्डे खोदले, औद्योगिक संघटनांचीही साथ  औरंगाबाद - ‘एमआयडीसी’ने औद्योगिक क्षेत्रामध्ये पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या...

01.18 PM