पुसद खून प्रकरणातील आरोपी जेरबंद 

police arrested for most wanted criminal
police arrested for most wanted criminal

नांदेड : विदर्भातील पुसद येथे खून व नांदेड जिल्ह्यात वेगवेगळ्या ठाण्यात दरोड्यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या फरार आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. नांदेडच्या मालटेकडी रेल्वेस्थानक परिसरात सिनेस्टाईल पाठलाग करून गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून तलवार व दुचाकी जप्त केली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी (ता. 20) सायंकाळी केली.

विदर्भातील पुसदमधील वसंतनगर पोलीस ठाण्यात खूनाचा व जबरी चोरीचा गुन्हा दाखल असलेला अट्टल आरोपी सुभाष मोहन पवार (वय 37 रा. बरडशेवाळा ता. हदगाव) हा नांदेड पोलिसांनाही विविध गंभीर गुन्ह्यात पाहिजे होता. त्याचे लोकेशन मिळवत तो नांदेडात असल्याचे समजताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्र सहाने यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद दिघोरे यांच्या पथकाला आदेश दिले.

यावरून दिघोरे, फौजदार कल्याण नेहरकर, सदानंद वाघमारे, कर्मचारी बालाजी सातपुते, तानाजी येळगे, माधव केंद्रे, राजू पांगरीकर यांनी सांगवी, इस्लामपूरा, देगलूर नाका परिसर पिंजून काढला. यावेळी आरोपी हा मालटेकडी रेल्वेस्थानक परिसराकडे जात असल्याची माहिती मिळताच या पथकांने पाठलाग केला. आरोपीला पोलिस पाठलाग करीत असल्याची माहिती मिळताच तो सुसाट सुटला. मात्र पोलिसांच्या झडपेपुढे त्याला हार पत्करावी लागली.

पोलिसांनी त्याच्याकडून एक तलवार व चोरीची दुचाकी जप्त केली. त्याला विमानतळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडीत पाठविले आहे. या पथकाचे पोलिस अधिक्षक चंद्रकिशोर मीना, अतिरिक्त पोलिस अधिक्षक मंगेश शिंदे आणि निरीक्षक सहाने यांनी कौतूक केले. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com