'टपाल जीवन विम्या'ची कोट्यवधींची उड्डाणे

शेखलाल शेख
बुधवार, 15 मार्च 2017

देशभरातील 64.61 लाख पॉलिसीधारकांकडून 37,571 कोटींची गुंतवणूक

देशभरातील 64.61 लाख पॉलिसीधारकांकडून 37,571 कोटींची गुंतवणूक
औरंगाबाद - विमा क्षेत्रातील खासगी कंपन्या प्रचार-प्रसारासाठी कोट्यवधी रुपये खर्च करीत असताना, कुठलीही जाहिरात न करता, विमा एजंटच्या साह्याने देशभरातील एक लाख 55 हजार टपाल कार्यालयांतून "पोस्टल लाईफ इन्शुरन्स'च्या 2014-15 मध्ये 64 लाख 61 हजार 413 पॉलिसी काढल्या गेल्या. यामध्ये 37, 571.77 कोटी रुपयांची गुंवतणूक (कॉर्पस फंड) झाली, तर ग्रामीण डाक जीवन विमा (आरपीएलआय) मध्ये 2014-15 या वर्षात तब्बल दोन कोटी 35 लाख 14 हजार 55 पॉलिसींची विक्रमी विक्री झाली आहे. यामध्ये 14,968.67 कोटी रुपयांची गुंतवणूक (कॉर्पस फंड) झाली. विशेष म्हणजे ग्रामीण आणि पोस्टल लाईफ इन्शुरन्सला दरवर्षी तुफान प्रतिसाद मिळत असल्याने टपाल विभागाने देशभरात विमा पॉलिसीतून कोट्यवधींची उड्डाणे घेतली आहेत.

भारतीय टपाल खात्याची विमा पॉलिसी ही देशातील सर्वांत जुनी मानली जाते. टपाल जीवन विम्याची स्थापना 1884 मध्ये झाली. शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सुरवातीला असलेली ही योजना नंतर 24 मार्च 1995 पासून ग्रामीण जनतेसाठी खुली झाली. विम्याची किमान मर्यादा हा दहा हजार, तर कमाल मर्यादा पाच लाख आहे. यामध्ये संपूर्ण जीवन विमा, मुदतीचा विमा (ग्राम संतोष), परिवर्तनीय संपूर्ण विमा (ग्रामसुविधा), प्रत्याक्षित मुदतीचा विमा (ग्राम सुमंगल), मुलांच्या पॉलिसीला सगळ्यांनी पसंती दिली आहे. विशेष म्हणजे यातील गुंतवणूक ही कलम 80 सी अंतर्गत प्राप्तिकर सवलतीस पात्र आहे.

'पोस्टल लाईफ इन्शुरन्स'ची गेल्या आठ वर्षांची कामगिरी
वर्षे .................. पॉलिसी संख्या ..................... गुंतवणूक

2007-08....................... 35,50,084....................12,081.71
2008-09......................... 38,41,539.....................14,152.59
2009-10......................... 42,83,302.....................16,656.02
2010-11.......................... 46,86,245.....................19,801.91
2011-12.......................... 50,06,060.....................23,010.55
2012-13.......................... 52,19,326......................26,131.34
2013-14........................... 54,06,093.....................32,716.26
2014-15............................ 64,61,413.....................37,5771.77
(आकडे कोटी रुपयांमध्ये)

'ग्रामीण डाक जीवन विम्या'च्या देशामधील पॉलिसी व गुंतवणूक
वर्षे................................... पॉलिसी संख्या.................... गुंतवणूक

2007-08....................... 61,67,928...........................3003.78
2008-09........................ 73,56,446...........................3994.36
2009-10........................ 99,25,103..........................5,524.69
2010-11...................... 1,22,03,345.........................6,607.79
2011-12...................... 1,35,47,355.........................9,141.43
2012-13...................... 1,46,64,650........................11,388.20
2013-14...................... 1,50,14,314........................13,352.01
2014-15...................... 2,35,14,055........................14,968.67
(आकडे कोटी रुपयांमध्ये)

Web Title: post life insurance