Rahati Electricity Shock One Farmer Died
Rahati Electricity Shock One Farmer Died

राहटी येथे विजेचा शॉक लागल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

नांदेड : ऊसाच्या पिकाला कृषीपंपाद्वारे पाणी देण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्याचा विद्युत शॉक लागल्याने मृत्यू झाला. ही घटना नांदेडपासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरवर असलेल्या राहटी येथे सोमवारी (ता. २३ ) घडली. 

राहटी (ता. नांदेड) येथील अल्पभूधारक शेतकरी दशरथ अप्पाराव बोकारे (वय ३८) हे आपल्याजवळ असलेल्या एक एकर शेतीवर व काही शेती बटाईने करून आपला उदरनिर्वाह करीत होते. 

अगोदरच महागाईने होरपळत असलेल्या शेतकऱ्यांना महावितरणचाही मोठा फटका बसत असतो. या भागात भारमियमन असल्याने शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी विजपुरवठा सुरू होताच शेतावर धावावे लागते. सोमवारी (ता. २३) सकाळी सहा ते सातच्या सुमारास दशरथ बोकारे हे ऊसाला पाणी देण्यासाठी गेले होते. परंतु वीजपुरवठा सुरू असलेल्या तारेला त्यांचा स्पर्श झाला आणि यातच त्यांचा मृत्यू झाला.

त्यांच्या पश्‍चात पत्नी, चार मुली असा परिवार आहे. रहाटी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अरूण बोकारे यांच्या माहितीवरुन लिंबगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com