अवकाळी पावसाची बीड जिल्ह्यात हजेरी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मार्च 2017

बीड - जिल्ह्यातील बहुतांशी भागात बुधवारी (ता.15) अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावली. यामध्ये आंब्यासह रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले. 

बुधवारी सकाळपासूनच काही भागांत आकाशात ढगांची गर्दी झाली होती. केज तालुक्‍यातील काही भागांत सकाळी दहा वाजताच वादळासह पाऊस झाला. दुपारनंतर परळी, अंबाजोगाई, पाटोदा तालुक्‍यात जोरदार पावसाने हजेरी लावली. गेवराई व धारूर तालुक्‍यातही पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने आंब्याचा मोहर व कैऱ्यांचे नुकसान झाले. तसेच शेतातील गहू, ज्वारी, हरभरा या पिकांचे मोठे नुकसान झाले. परळी भागात पावसामुळे रस्त्यावरून पाणी वाहिले.

Web Title: rain in beed