परभणी: मृग नक्षत्रावर जिल्हयात समाधानकारक पाऊस

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 जून 2018

परभणी जिल्हयातील सर्वच तालुक्यात मंगळवारी (ता. सहा) व बुधवारी सकाळी हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. गंगाखेड, पालम, पूर्णा, सोनपेठ, पाथरी, जिंतूर, मानवत, सेलू व परभणी तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला.

परभणी : परभणीसह जिल्ह्यात बुधवारी (ता.सात) सकाळी सर्वत्र हलक्या व मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मृग नक्षात्रावर झालेल्या या पावसाने पेरणीची सुरुवात होण्याची शक्यता आहे. समाधान कारक पाऊस असल्याचे शेतकरी वर्गातून सांगण्यात येत आहे.

परभणी जिल्हयातील सर्वच तालुक्यात मंगळवारी (ता. सहा) व बुधवारी सकाळी हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. गंगाखेड, पालम, पूर्णा, सोनपेठ, पाथरी, जिंतूर, मानवत, सेलू व परभणी तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला.

बुधवारी पहाटे साडेपाच वाजता मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. जिल्हयात सरसरी 5. 83 मिली मिटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वात जास्त पाऊस पूर्णा तालुक्यात 12.6 मिलीमिटर झाला.

Web Title: rain in Parbhani

टॅग्स