युती तुटणार हे लिहून ठेवले होते - दानवे 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

नांदेड - महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन महिन्यांपासून भाजपच्या राज्यात झालेल्या प्रत्येक बैठकीत स्वतंत्र निवडणुका लढण्याची तयारी ठेवा, असे सांगण्यात येत होते. युती तुटणार हे माहिती होते... तुम्हाला खोटे वाटत असेल, तर माझ्या खिशात डायरी आहे त्यात मी लिहून ठेवत असतो, असा गौप्यस्फोट करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी खिशातील डायरी काढून कार्यकर्त्यांना पुरावा म्हणूनही दाखविली. 

वादग्रस्त विधानांमुळे दानवे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात दुरावा निर्माण झाल्याची चर्चा सध्या मीडियात चर्चेचा विषय बनली आहे आणि मराठवाड्याकडे लक्ष देण्याचे दानवेंना सांगण्यात आल्याचे सांगितले जाते. या सर्व बाबींमुळे बॅकफुटवर आलेल्या दानवे यांनी नांदेडमध्ये युती तुटणार असल्याचे दोन महिन्यांपूर्वीच डायरीत लिहिल्याचे म्हटल्याने आता नवीन वादाला तोंड फुटेल, असे दिसत आहे.

मराठवाडा

उस्मानाबाद : जिल्ह्यात गेल्या १४ तासांपासून संततधार पाऊस सुरू आहे. सकाळी सहाडेआठपर्यंत गेल्या चोवीस तासांत सरासरी ६५.१० मिलीमीटर...

01.12 PM

औरंगाबाद : शाडू मातीच्या गणेश मूर्ती बनवण्याच्या कार्यशाळेला 'सकाळ' कार्यालयात रविवारी (ता. 20) सकाळी उत्साहात सुरवात झाली. विविध...

12.45 PM

औरंगाबाद : तब्बल दोन महिन्याच्या विश्रांतीनंतर मराठवाड्यात शनिवारी दुपारनंतर सर्वत्र रिमझिम-मुसळदार पावसाने हजेरी लावली. हवामान...

11.48 AM