रिक्षाचालकांचा बंद; प्रवाशांचे हाल 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

औरंगाबाद - रिक्षाचालकांच्या चक्काजाम आणि बंद आंदोलनामुळे मंगळवारी (ता. 31) सर्वसामान्य प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. दरम्यान, आंदोलनाचा फायदा घेत काही रिक्षाचालकांनी दुप्पट भाडेवाढ करून प्रवाशांची लूट केली. 

औरंगाबाद - रिक्षाचालकांच्या चक्काजाम आणि बंद आंदोलनामुळे मंगळवारी (ता. 31) सर्वसामान्य प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. दरम्यान, आंदोलनाचा फायदा घेत काही रिक्षाचालकांनी दुप्पट भाडेवाढ करून प्रवाशांची लूट केली. 

परिवहन विभागाच्या शुल्कवाढीच्या निषेधार्थ विविध रिक्षा संघटनांनी रिक्षा बंद ठेवून चक्काजाम आंदोलन केले. या आंदोलनामुळे मध्यवर्ती बसस्थानक, सिडको बसस्थानक आणि रेल्वेस्थानकात आलेल्या प्रवाशांना रिक्षा मिळत नव्हत्या. काही पाच ते दहा टक्के रिक्षाचालकांनी रस्त्यावर प्रवासी वाहतूक केली. मात्र, या रिक्षाचालकांनी बंदचा फायदा घेऊन प्रवशांकडून दुप्पट, तिप्पट रक्कम वसूल केली. जालना, रोड, जळगाव रोड, हर्सूल टी-पॉईंट, महावीर चौक, क्रांती चौक, चिकलठाणा, हर्सूल आदी भागांतून शहरात येणाऱ्या-जाणाऱ्यांना रिक्षा मिळणे दुरापास्त झाले होते. परिणामी, प्रवाशांचे हाल झाले. 

शहर बसही गायब 
रिक्षा बंदमुळे शहर बसची मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, शहर बसही रस्त्यावर दिसत नव्हत्या. दुपारी एकपर्यंत शहर बस बंद ठेवण्यात आली होती. दुपारनंतर बस सुरू केल्यचा दावा एसटी महामंडळाने केला; पण, प्रत्यक्षात बस रस्त्यावर दिसत नव्हत्या. बस येईल याची कुठलीही खात्री नसल्याने प्रवासी मिळेल त्या वाहनाने जाण्याचा प्रयत्न करीत होते.

मराठवाडा

वर्चस्वाच्या लढाईत भाजपचे विजयाकडे वाटचाल; 13 विरुद्ध शुन्य मतांचा ठराव औरंगाबाद: मराठवाड्याचे लक्ष लागून राहीलेल्या औरंगाबाद...

06.18 PM

कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करा हिंगोलीः जिल्हयात कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिध्द...

04.00 PM

औरंगाबाद : कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याने शिवसेना आक्रमक झाली असून त्यांनी मंगळवार (ता.22) रोजी...

02.33 PM