पंकजा मुंडेना CM पदासाठी संभाजीराजेंच्या शुभेच्छा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 डिसेंबर 2016

बीड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या कार्यक्रमाला नरेंद्र मोदी रायगडावर आले आणि पंतप्रधान झाले. तुम्हालाही मी रायगडावर येण्याचे निमंत्रण देत आहे, तुम्हीदेखील राज्याच्या मुख्यमंत्री व्हाल अशा शब्दांत खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी राज्याच्या महिला व ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. निमित्त होते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्त आयोजित परळीतील गोपीनाथ गडावरील अभिवादन कार्यक्रमाचे.

रायगडावर होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे निमंत्रण आपण मंत्री पंकजा मुंडे यांना दिले असल्याचे सांगत भोसले यांनी नरेंद्र मोदी हे या सोहळ्याला आले आणि पंतप्रधान झाले याची आठवण करुन दिली. आता पंकजाही या सोहळ्याला हजेरी लावतील आणि मुख्यमंत्री होतील असे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात एक वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे.

राज्यात नेतृत्व बदलाची कुठलीही शक्‍यता नसतांना भोसले यांनी केलेल्या या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
गोपीनाथ मुंडे यांनी आपल्याला खासदार करण्याचा शब्द दिला होता आणि तो त्यांनी पाळला याची आठवण करुन देतांनाच भाजपात मी यावे यासाठी देखील तेच आग्रही होते याचा खुलासाही भोसले यांनी यावेळी केला

मराठवाडा

नांदेड : जिल्ह्यातील देगलूर येथील लोहिया मैदान परिसरात एका निर्दयी मातेने आपल्या दोन महिन्यांच्या मुलीला नाल्यात फेकून दिले...

08.15 PM

पाथरी : खाजगी कर्ज काढून दोनदा पेरणी केल्यानंतर ही पावसाअभावी पीक न उगवल्याने नैराश्यातून एका तरुण शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन...

02.03 PM

औरंगाबाद - रेल्वेतील टीसीची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून अनेकांना गंडा घालणाऱ्या मुख्य सूत्रधाराला बुधवारी (ता. १६) अटक...

01.45 PM