ऍपद्वारे एकवीस लाखांचा अपहार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 एप्रिल 2017

बदनापूर - बॅंक ऑफ महाराष्ट्र व "यूपीआय' (युनिफाईड पेमेंट्‌स इंटरफेस) या ऑनलाइन रक्‍कम हस्तांतरण सेवेचा गैरवापर करून तीनजणांनी 21 लाख 43 हजार 774 रुपयांचा अपहार करून बॅंकेची फसवणूक केली.

याप्रकरणी बदनापूर येथील महाराष्ट्र बॅंकेच्या शाखाधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून त्या तिघांविरुद्ध गुरुवारी (ता. सहा) बदनापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

बॅंकेचे शाखाधिकारी प्रकाश खंडेराव हनुमंते यांनी तक्रारीत म्हटले, संशयित विशाल हनुमान सोनवणे (रा. शेलगाव, ता. बदनापूर), अरुण भीमराव डोळसे (रा. मानदेऊळगाव, ता. बदनापूर, हल्ली मुक्‍काम जालना) व राहुल भगवान मघाडे (रा. शेलगाव) यांनी बॅंक ऑफ महाराष्ट्र व "यूपीआय' ऑनलाइन रक्‍कम हस्तांतरण सेवेचा गैरवापर केला. तसेच नावासमोर दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या खात्याचा दुरुपयोग करून एकूण 21 लाख 43 हजार 774 रुपयांचा अपहार करून बॅंकेची फसवणूक केली. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपविण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणातील संशयित आरोपी अरुण डोळसे याने सांगितले की, बॅंकेच्या ऑनलाइन सेवेत त्रुटी असल्यामुळे हा प्रकार घडलेला आहे. वास्तविक माझ्या खात्यात वर्ग झालेली रक्‍कम मी आठ दिवसांपूर्वीच बॅंकेत जमा केली आहे. मात्र यानंतरही माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: scam by app