पेरणीसाठी पैसे नसल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 जून 2017

शिरूर कासार (जि. बीड) - पेरणीसाठी पैसे न मिळाल्याने आर्वी (ता. शिरूर कासार) येथील शेतकरी साईनाथ मच्छिंद्र भोसले (वय 35) यांनी घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली.

शिरूर कासार (जि. बीड) - पेरणीसाठी पैसे न मिळाल्याने आर्वी (ता. शिरूर कासार) येथील शेतकरी साईनाथ मच्छिंद्र भोसले (वय 35) यांनी घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली.

दुष्काळी स्थितीमुळे अल्पभूधारक भोसले यांची आर्थिक स्थिती हलाखीची बनली होती. त्यामुळे ते तीन वर्षांपासून ऊसतोडीसाठी जात होते. यंदा खरीप पेरणीची ते तयारी करीत होते. पेरणीसाठी त्यांनी अनेकांकडे उसनवारीने पैसे मागितले; पण त्यांना ते मिळाले नाहीत, असे सांगण्यात आले. पैसे आणण्यासाठी पत्नी माहेरी गेली असता दुपारी त्यांनी जीवनयात्रा संपवली.