'आशुरा'निमित्त सवाऱ्यांचा मजमा ; शिया समुदायाचा मातमी जुलूस

'आशुरा'निमित्त सवाऱ्यांचा मजमा ; शिया समुदायाचा मातमी जुलूस

औरंगाबाद : दहा मोहरम "आशुरा'निमित्त शुक्रवारी (ता. 21) सिटी चौकात सवाऱ्यांची मिरवणूक (मजमा) काढण्यात आली. तर शिया बांधवांनी मातमी जुलूस काढून हजरत इमाम हुसैन यांच्या स्मृती जागविल्या.

सवाऱ्या व मातमी जुलूस पाहण्यासाठी नागरिकांची सिटी चौक भागात गर्दी केली. यावेळी आलम बरदार समितीचे अध्यक्ष रशीद मामू, अंजुमन खादीमूल मासुमीनचे अध्यक्ष एजाज जैदी यांच्यासह हजारो नागरीकांची उपस्थिती होती. 

सिटी चौकात सवाऱ्यांचा मजमा 

मोहरम महिन्याच्या दहा तारखेला "यौमे-ए-आशुरा' साजरा करण्यात येतो. मोहरममध्ये शहरात 111 सवाऱ्या बसविण्यात आल्या. या सवाऱ्यांचा मजमा सिटी चौक भागात भरविण्यात आला. सिटी चौकात ढोल, ताशे यांच्यासह सवाऱ्यांचा मजमा भरला होता. सिटी चौक भागात या सवाऱ्यांचे मान्यवरांनी स्वागत केले; तसेच हजरत इमाम हुसैन व इमाम हसन यांच्या आठवणीत शहारात विविध ठिकाणी सबरताचे वाटप करून अन्नदान करण्यात आले. शहरात बडे चांद साब, छोटे चांद साब, हिरे की सवारी, शेरोंवाली सवारी, कौडी की सवारी, पंजे सवारी या सवाऱ्या महत्त्वाच्या मानल्या जातात. या सवाऱ्यांचे मजमानंतर विसर्जन करण्यात आले. 

शिया समुदायाचा मातमी जुलूस 

मोहरम महिन्यात मोहम्मद पैगंबरांचे नातू हजरत इमाम हुसैन यांच्या स्मृतीत शिया समुदायातर्फे मजलीसचे आयोजन करून मातम करण्यात येतो. दहा मोहर्रम म्हणजेच यौमे आशुराच्या दिवशी शुक्रवार (ता.21) सकाळी सात वाजता फाजलपुरा येथील मोहम्मद नवाब यांच्या आशुरखान्यापासून मातमी जुलूस काढण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com