सिडको नाट्यगृहाचे कोसळले सीलिंग

औरंगाबाद - सिडको नाट्यगृहातील सिलिंग निखळत असून, शुक्रवारी आणखी एक भाग कोसळला. सुदैवाने यात जीवीत हाणी झाली नाही.
औरंगाबाद - सिडको नाट्यगृहातील सिलिंग निखळत असून, शुक्रवारी आणखी एक भाग कोसळला. सुदैवाने यात जीवीत हाणी झाली नाही.

औरंगाबाद - महापालिकेच्या दुर्लक्षामुळे संत तुकाराम सिडको नाट्यगृहाची वाताहत सुरू झाली आहे. शुक्रवारी (ता. 20) दुपारी नाट्यगृहाच्या मोकळ्या जागेतील सीलिंग कोसळले. याच ठिकाणी दोन महिला बसलेल्या होत्या. सुदैवाने त्या बचावल्या. घटनेनंतर महापौरांनी नाट्यगृहाची पाहणी करून तातडीने दुरुस्तीचे आदेश दिले.

शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या भव्य नाट्यगृहाची सिडको प्रशासनाने उभारणी केली आहे; मात्र नाट्यगृह महापालिकेकडे हस्तांतरित झाल्यापासून या वास्तूची वाताहत सुरू झाली आहे. तुटलेल्या खुर्च्या, सदोष ध्वनियंत्रणा, वातानुकूलित यंत्रणा वारंवार बंद पडणे हे प्रकार नित्याचेच झाले आहेत. त्यात आता एक-एक भाग निखळून पडत आहे.

एरवी नको त्या कामांवर लाखो रुपयांची उधळपट्टी करणारे प्रशासन नाट्यगृहाच्या देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यात शुक्रवारी दुपारी नाट्यगृहाबाहेर असलेल्या मोकळ्या जागेतील छताचे सीलिंग कोसळले. त्यापूर्वी "म्हाडा'तर्फे घरांची सोडत काढण्याचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू होता. नुकताच कार्यक्रम संपल्याने अनेकजण निघून गेले होते; तर दोन महिला खुर्चीवर बसलेल्या होत्या. सुदैवाने पाच बाय पाच फुटांचे व पाच ते सात किलो वजनाचे सीलिंग त्यांच्यापासून दोन फूट अंतरावर कोसळले. घटनेची माहिती मिळताच महापौर नंदकुमार घोडेले यांनी तातडीने भेट देऊन तांत्रिक तपासणी करण्याचे व धोकादायक भाग काढून घेण्याचे आदेश दिले. काही दिवसांपासून सीलिंगचा भाग कोसळत असून, त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. गेट अंगावर कोसळून यापूर्वी एका सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com