राजकीय पाठबळामुळे निश्‍चिंत होते सीताराम सुरे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 मे 2017

ओरंगाबाद - शिवसेना नगरसेवक सीताराम सुरे यांचाच मुलगा परीक्षार्थी होता. त्यामुळे त्याच्या दिमतीसाठी घरीच परीक्षा देता यावी, म्हणून सुरे प्रयत्नशील होते. विशेष म्हणजे, महाविद्यालयानेही आपली "दुकानदारी' करण्यास योग्य ठिकाण सापडल्याने यासाठी लागलीच होकार दर्शविला. राजकीय पाठबळ व कोणाचाही अडसर होणार नाही, या मुजोरीपणाने घात केला अन्‌... पोलिसांच्या सापळ्यात सर्वजण अडकले.

नगरसवेक सीताराम सुरे यांचा मुलगा किरण साई अभियांत्रिकी महाविद्यालयात द्वितीय वर्षाचे शिक्षण घेतो. मुलाला पास करण्यासाठी सर्वकाही करण्याची सुरेंची तयारी होती. यातूनच मित्रपक्षाशीच संबंधित असलेल्या साई महाविद्यालयातील काही मंडळींशी त्यांची बोलणी झाली. सुरे नगरसेवक आहेत, त्याशिवाय महापालिकेत सत्ताधारी असल्याने राजकीय वलय आहे. वजनही आहे, अशी धारणा पेपर मॅनेज करणाऱ्यांची झाली. विशेषत: सुरेवाडी परिसरात कसलीच अडचण नाही. आपलाच वॉर्ड व परिसर असल्याने कोणाला काही थांगपत्ता लागणार नाही, अशी हमी सुरेंनी महाविद्यालयाला दिल्याचे सूत्रांनी सांगितले. शिवाय पोलिसांनाही या बाबी कळणार नाहीत. कळाल्यासही त्यांच्याकडून एवढी मोठी कारवाई होईल, असेही त्यांना वाटले नव्हते. या सर्व बाबींमुळे ते निश्‍चिंत होते. मात्र, केवळ तीन पोलिस कर्मचाऱ्यांनी पेपर मॅनेज करणाऱ्या अख्ख्या यंत्रणेलाच सुरूंग लावला.

जमलेल्या दुचाकीवरून संशय
सीताराम सुरे यांच्याच घरात परीक्षा केंद्र असल्याची बाब कळू नये म्हणून विद्यार्थ्यांच्या दुचाकी दुसरीकडे पार्क केल्या जात होत्या. परिसरात कुठेही दुचाकी लावल्या जात होत्या. याचा त्रास स्थानिकांना सुरू झाला. तसेच याबाबत दुकान, पानटपऱ्यांवर व परिसरातच चर्चा सुरू झाली. सुरेंच्या घरी कार्यकर्त्यांऐवजी विद्यार्थ्यांची गर्दी पाहून लोक संशयाने पाहू लागले त्यातून सारा प्रकार पोलिसांपर्यंत सहज पोचला.

मराठवाडा

पूर्णा (परभणी): तालुक्यातील बरबडी येथील लक्ष्मण गणेश सोलव या बावीस वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्यांने कर्जबाजारीपणामुळे गळफास घेऊन...

06.57 PM

मराठवाडा जनता विकास परिषदेच्या पाठपुराव्याला यश औरंगाबाद : दमणगंगेचे पन्नास टीएमसी (50 अब्ज घनफुट) पाणी गोदावरी खोऱ्यात सोडून...

06.09 PM

लोहा : बैलगाडा घेऊन शेतीकामाला जात असताना बैलगाडा उलथून झालेल्या अपघातात शेतमजुराचा मृत्यू झाला. ही घटना हिप्परगा गावालगतच्या...

05.30 PM