एसटीपीचे पाणी वापरणार बांधकाम, उद्यानांसाठी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 मे 2018

औरंगाबाद - कांचनवाडी येथील मल-जलनिस्सारण प्रकल्पातून नाल्यात सोडले जाणारे ५५ एमएलडी पाणी बांधकाम व्यावसायिक आणि उद्यानांसाठी देण्याचे नियोजन महापालिकेमार्फत केले जात आहे. शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. वाया जाणारे पाणी वापरात यावे, यासाठी ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. 

भूमिगत गटार योजनेंतर्गत महापालिकेने १५६ एमएलडी क्षमतेचा मल-जल निस्सारण प्रकल्प कांचनवाडी येथे उभारला आहे. या प्रकल्पातून बाहेर पडणारे पाणी डीएमआयसीमधील कंपन्यांना देण्याचे महापालिकेचे नियोजन होते; मात्र वारंवार आवाहन करूनही एमआयडीसी, डीएमआयसीने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे सध्या सुमारे ५५ एमएलडी पाणी नाल्यात सोडण्यात येत आहे. एकीकडे शहराला दरवर्षीच भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते; तर दुसरीकडे एसटीपीचे ५५ एमएलडी पाणी नाल्यात सोडण्यात येते. हे पाणी वापरात आले पाहिजे, यासाठी ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. आता हे पाणी बांधकाम व्यावसायिक आणि उद्यानांना देण्याचा प्रशासनाचा विचार आहे. यातून महापालिकेच्या उत्पन्नात थोडीफार भर पडणार आहे. त्यामुळे शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी सविस्तर प्रस्ताव तयार करावा, अशा सूचना अफसर सिद्दिकी यांना केल्या आहेत. त्यासाठी महापालिका प्रकल्पापासून मुख्य रस्त्यापर्यंत पाइपलाइन टाकणार आहे किंवा प्रकल्पापर्यंत टॅंकर जावेत, यासाठी दिशादर्शक फलक लावणार आहे. त्याची तयारी प्रशासनातर्फे सुरू आहे.

ना नफा-ना तोटा तत्त्वावर देणार पाणी 
प्रकल्पातून बाहेर पडणारे पाणी उद्योजक घेण्यास उत्सुक नसल्याने खासगी व्यक्तींना पाणी देताना भावही कमी करण्याची तयारी महापालिकेने केली आहे. ना नफा-ना तोटा तत्त्वावर केवळ वीज बिल, कर्मचाऱ्यांचा खर्च भागेल, यासाठी दोनशे रुपयेप्रमाणे टॅंकर दर ठेवण्याचा निर्णय प्रशासनाच्या विचाराधीन आहे. 

Web Title: STP water construction garden