Suspected accused vaishali mane and his husband arrested in murder case of surekha rathod
Suspected accused vaishali mane and his husband arrested in murder case of surekha rathod

किनवट : मुख्याध्यापिका सुरेखा राठोड खून प्रकरणी दोघांना अटक

किनवट : मुख्याध्यापिका सुरेखा राठोड खून प्रकरणातील संशयित आरोपी वैशाली माने आणि तिचा नवरा प्रा. शेषेराव माने यांना स्थानिक गुन्हे शाखेने काल रात्री अटक केली आहे.

गोकुंदा (ता. किनवट) येथील शांती निकेतन पब्लिक इंग्रजी शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा विजय राठोड यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी क्रमांक दोन वैशाली माने आणि तिचा नवरा शेषराव माने या दोघांना स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरिक्षक सुनिल निकाळजे आणि त्यांच्या पथकाने 16 सप्टेंबरच्या मध्यरात्रीनंतर ताब्यात घेतले आहे.         

किनवट येथील जनतेने पोलिसांना 17 सप्टेंबर पर्यंत आरोपींना अटक झाली नाही तर तिव्र आंदोलन करु असा इशारा दिला होता. पोलिस अधिक्षक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुनिल निकाळजे आणि त्यांच्या पथकाने जनतेच्या इशाऱ्याची नोंद घेत ता. 16 च्या मध्यरात्रीनंतर या प्रकरणातील दोन संशयित मारेकऱ्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांना आज (ता. 17) किनवटच्या न्यायालयासमोर दुपारी हजर करण्यात येणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com