तनिष्का निवडणुकीचा उत्साह शिगेला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 ऑक्टोबर 2016

औरंगाबाद - ‘सकाळ माध्यम समूहा’च्या स्त्रीप्रतिष्ठा अभियान अर्थात ‘तनिष्का’ व्यासपीठाच्या १५ व १६ ऑक्‍टोबरला होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. रिंगणात असलेल्या तनिष्का उमेदवारांचा प्रचार शिगेला पोचला आहे.  

औरंगाबाद - ‘सकाळ माध्यम समूहा’च्या स्त्रीप्रतिष्ठा अभियान अर्थात ‘तनिष्का’ व्यासपीठाच्या १५ व १६ ऑक्‍टोबरला होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. रिंगणात असलेल्या तनिष्का उमेदवारांचा प्रचार शिगेला पोचला आहे.  

तनिष्का निवडणुकीसाठी शहरातील ११३ वॉर्डांच्या नऊ झोनमध्ये चुरशीच्या निवडणुका होत आहेत. निवडणुकीसाठी झोन क्रमांक १ मध्ये ः हेमलता सुरेंद्र लखमल, वंदना शेषराव जाधव, सीमा संजय कोलते, वैशाली स्टॅलीन निकाळजे, झोन क्रमांक २ मध्ये - प्रीती मनोजकुमार पाटणी, सपना सावन चुडीवाल, किरण श्रीवल्लभ शर्मा, आरती जीवन देशपांडे. झोन क्रमांक ३ मध्ये ः साहिका मीर हिदायत अली, शबाना बेगम मुजीम खान मुलतानी, शेख शगुफ्ता जिया, डॉ. साहीन फातेमा मोहसीन अहमद. झोन क्रमांक ४ मध्ये ः सारिका मनोहर बनकर, ममता महेश मिसाळ, पूजा मयूर सोनवणे, भारती सोमनाथ जाधव. झोन क्रमांक ५ मध्ये ः अस्मिता अरुण मलिक, अंजली नामदेव चिंचोलीकर, स्वाती राजेंद्र पवार, अर्चना संजय मुंदडा. झोन क्रमांक ६ मध्ये ः वसुधा कल्याणकर, ॲड. निता खंसरे, शीला रमेश अवचार, संगीता फुलवरे. झोन क्रमांक ७ मध्ये ः सरोज योगेश मसलगे पाटील, अंजली रमाकांत वडजे पाटील. झोन क्रमांक ८ मध्ये ः सुरय्याबेगम मोहम्मद हुसेन पठाण, शुभांगी वसंत लातूरकर, अश्‍विनी सूरज बडग, मेघा बद्रिनाथ थोरात पाटील. झोन क्रमांक ९ मध्ये ः प्रिया अभिजित धारुरकर, सुदर्शना प्रकाश जाधव, अंजली कमलाकांत उंबरकर, जान्हवी शैलेश माहूरकर आदी तब्बल ३४ महिला उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकीसाठी अत्यंत चुरस निर्माण झाली असून, प्रत्येक उमेदवार अधिकाधिक महिलांपर्यंत जाऊन निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत. या निवडणुकीत महिलांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असा प्रयत्न सर्व पातळीवर केला जात आहे. त्यासाठी महिलांच्या संघटना, संस्था, क्‍लब, महिला मंडळ, भिशी मंडळ, भजनी मंडळांच्या महिलांशी तनिष्का उमेदवार प्रत्यक्ष संवाद साधत आहेत. 

‘सकाळ’ कार्यालयात बैठक 
तनिष्का निवडणुकीची धामधूम सुरू असताना, निवडणुकीच्या अनुषंगाने शहरातील प्रत्येक झोनमधील महिला उमेदवारांची ‘सकाळ’च्या कार्यालयात बुधवारी (ता. १२) बैठक झाली. निवडणुकीच्या दिवशी प्रत्यक्ष मतदानप्रक्रियेत अधिकाधिक महिलांना मतदानात सहभागी करून घेण्यासाठीची व्यूहरचना आखण्यात आली. झोननिहाय प्रचारावर या वेळी चर्चा करण्यात आली. विविध विकासाचे मुद्दे, सामाजिक प्रश्‍न घेऊन महिला उमेदवार रिंगणात असल्याने महिलांमध्ये उत्साह, कुतूहल असल्याने प्रत्येक महिला मतदान कशी करील यावर भर देण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला.

प्रत्येक महिलेला मतदानाचा अधिकार 
तनिष्का व्यासपीठ हे महिलांच्या कलागुणांना आणि नेतृत्वगुणांना वाव मिळावा यासाठीतर आहेच; मात्र महिलांच्या माध्यमाने सामाजिक व राजकीय बदल व्हावा, महिलांच्या माध्यमाने विकासकामांना बळ मिळावे, हा प्रमुख उद्देश आहे. प्रत्येक महिलेला आपल्या परिसरातील प्रश्‍न सोडविण्यासाठी आपल्या हक्काची तनिष्का निवडून द्यावयाची आहे. या मतदानप्रक्रियेत शहरातील कुणीही महिलेला सहभागी होता येणार आहे. शहरातील प्रत्येक महिलेला आपल्या जवळच्या मतदान केंद्रावर शनिवारी (ता. १५) सकाळी आठ ते दोन या वेळेत मतदान करता येणार आहे.

टॅग्स