औरंगाबादेत एप्रिलमध्ये शिक्षक साहित्य संमेलन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मार्च 2017

औरंगाबाद - यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, त्याचे येथील विभागीय केंद्र, शिक्षण विकास मंच व एमजीएमतर्फे येथे 15, 16 एप्रिलला राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी शिक्षक साहित्यिक बालाजी मदन इंगळे यांची निवड झाली आहे. संमेलनाच्या निमंत्रक खासदार सुप्रिया सुळे असून, आमदार विक्रम काळे स्वागताध्यक्ष आहेत.

अभ्यासक्रमाशी संबंधित विषयांवर, शैक्षणिक विषयांवर लिहिणारे, ललित साहित्य, अशा अंगाने लेखन करणारे प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक एकत्र येऊन आपले विचार, कल्पना, अनुभवांची देवाण - घेवाण करतील. शिक्षकांना साहित्यिक म्हणून ओळख मिळावी, त्यांच्याकडून साहित्य निर्मिती व्हावी, हा संमेलनाचा मुख्य उद्देश आहे.