नांदेड येथील शासकिय रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा

प्रल्हाद कांबळे
मंगळवार, 29 मे 2018

येथील शासकिय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात रुग्णांची संख्या मोठी आहे. विशेष करून अपघात व प्रसुती यासोबतच थॅलेसेमिया रूग्णांची संख्या जास्त असल्याने रक्ताची मागणीनुसार पुरवठा करणे रूग्णालय प्रशासनाला अवघड जात आहे.

नांदेड - एकीकडे शाळा महाविद्यालयांना सुट्या तर दुसरीकडे वाढते तापमाण लक्षात घेता रक्तदान शिबिरांची संख्या रोडावली. याचा परिणाम रुग्णांवर पडत असून शासकिय रूग्णालयात रक्ताचा तुटवडा भासत असल्याने रुग्णालय प्रशासनासह रुग्णाच्या नातेवाईकांना कसरत करावी लागत आहे. 

येथील शासकिय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात रुग्णांची संख्या मोठी आहे. विशेष करून अपघात व प्रसुती यासोबतच थॅलेसेमिया रूग्णांची संख्या जास्त असल्याने रक्ताची मागणीनुसार पुरवठा करणे रूग्णालय प्रशासनाला अवघड जात आहे. आज घडीला श्री. गुरू गोविंदसिंग शासकिय रक्तपेढीत फ्कत ९५ रक्तपिशवी, आणि रक्तघटक तसेच ११० ल्पाझमा एवढ्या पिशव्या उपलब्ध आहेत. अचानक एखादा मोठा अपघात झाल्यास रक्तासाठी धावपळ करावी लागते. तसेच जिल्ह्यात थॅलेसेमिया या रुग्णांची संख्या २५० असून त्यांना दर पंधरा किंवा दर महा रक्त द्यावे लागते. रक्तदात्यांनी पुढे येण्याचे आवाहन रक्तपेढीचे प्रमुख डॉ. संतोष पवार यांनी केले आहे.
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: There is a shortage of blood in the government blood bank of Nanded