ट्रक-ट्रॅक्‍टर धडकेत येडशीजवळ तिघे ठार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

येडशी - ट्रक- ट्रॅक्‍टरच्या धडकेत तीन जण ठार झाले, तर तीन गंभीर जखमी झाले. धुळे- सोलापूर महामार्गावर येडशीनजीकच्या उड्डाणपुलाजवळ आज सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हा अपघात झाला. मृत, जखमी येडशी येथील आहेत.

येथील दीपक नागटिळक यांच्या शेतातील कडबा घेऊन ट्रॅक्‍टर (एमएच- २५, एच- ६९९०) येडशीकडे निघाला होता. ट्रॅक्‍टरमध्ये चालकासह सहाजण होते. येडशी उड्डाणपुलाजवळ ट्रॅक्‍टर व उस्मानाबादकडे निघालेल्या ट्रकची (एपी- १६, टीजी- २०८८) धडक झाली. त्यात ट्रॅक्‍टरमधील समाधान राजेंद्र अवधूत (वय १८), विशाल बापू जगताप (२१) हे जागीच ठार झाले. संतोष विठोबा नागटिळक (३८) यांचा उस्मानाबादेत उपचारादरम्यान मृत्यू झाला.  सुनील सोपान नागटिळक (३२), दीपक कुंडलिक नागटिळक (२२), जयदेव मारुती बेदरे (२५) हे गंभीर जखमी झाले. त्यांना उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

Web Title: three death in truck tractor accidet