तुरीने शेतकऱ्यांना तारले 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017

औरंगाबाद - यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने मक्‍याचे मोठ्या प्रमाणात पीक आल्यानंतर आता तुरीने शेतकऱ्यांना तारले आहे. प्रतिएकरी तुरीचा उतारा चांगला मिळत असल्याने गेल्या वर्षाच्या तुलनेत औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीची विक्रमी आवक झाली. 1 जानेवारी ते 11 फेब्रुवारी या 41 दिवसांत तब्बल 40 हजार 906 क्विंटल तुरीची आवक झाली आहे. 

गेल्या वर्षी भीषण दुष्काळामुळे तुरीचे पीक शेतकऱ्यांच्या हातून गेले होते. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये तुरीची अत्यल्प आवक झाली होती. या वर्षी पाऊस चांगला झाल्याने, तसेच तुरीला वेळेवर पाणी मिळाल्याने एकरी चांगला उतारा मिळाला आहे. जानेवारीत औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 32 हजार 314 क्विंटल तुरीची आवक झाली. याला 3700 ते 5000 हजार रुपये असा दर मिळाला, तर सरासरी 4 हजार 350 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. फेब्रुवारीतसुद्धा तुरीची आवक जास्त असून, 11 फेब्रुवारीपर्यंत 11 दिवसांत 8 हजार 592 क्विंटलची आवक झाली आहे. आवक जास्त असली, तरी शेतकऱ्यांना दरही चांगला मिळाला आहे. कमीत कमी दर हा साडेतीन हजार रुपये प्रतिक्विंटल, तर सरासरी दर 4 हजार 350 एवढा आहे. 

हमीभाव केंद्रावर साडेचार हजार क्विंटल तूर 
भारतीय अन्न महामंडळातर्फे बाजार समितीच्या आवारात तुरीला हमीभाव देणारे केंद्र 21 डिसेंबर 2016 रोजी सुरू केले होते. या केंद्रावर शेतकऱ्यांना 5 हजार 50 रुपये हमीभाव दिला जात आहे. या केंद्रावर 11 फेब्रुवारीपर्यंत 4 हजार 453 क्विंटल तुरीची आवक झाली आहे. म्हणजेच, बाजार समितीमध्ये जवळपास 45 हजार 359 क्विंटल तुरीची आवक झालेली आहे.

Web Title: Turdal aurangabad