कंटेनर-दुचाकीच्या अपघातात दोघे ठार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

अंत्यविधीसाठी जाताना मिटमिटा परिसरात घडली घटना

औरंगाबाद - भरधाव कंटेनर व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने दुचाकीवरील दोघे ठार झाले. ही घटना रविवारी (ता. १३) सकाळी अकराच्या सुमारास मिटमिटा परिसरातील हॉटस्पॉट ढाब्याजवळ घडली. 

अंत्यविधीसाठी जाताना मिटमिटा परिसरात घडली घटना

औरंगाबाद - भरधाव कंटेनर व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने दुचाकीवरील दोघे ठार झाले. ही घटना रविवारी (ता. १३) सकाळी अकराच्या सुमारास मिटमिटा परिसरातील हॉटस्पॉट ढाब्याजवळ घडली. 

कडा कार्यालयातील आरेखक रावसाहेब रामराव धस (वय ५०, रा. मुकुंदवाडी), शिक्षक दादाराव लक्ष्मणराव घोडके (वय- ५०, रा. हनुमाननगर), अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. धस व घोडके दोघे दुचाकीने अंत्यविधीसाठी पडेगाव-मिटमिटा मार्गे दौलताबाद येथे जात होते. मिटमिटा परिसरातील हॉटस्पॉट ढाब्याजवळ अहमदाबादहून हैदराबादकडे जाणाऱ्या मालवाहू कंटेनरची व दुचाकीत समोरासमोर धडक बसली. या अपघातात धस व बोडके गंभीर जखमी झाले. अपघात एवढा भीषण होता की, घटनास्थळी एकाचा मृत्यू झाला. ही घटना समजताच छावणी पोलिस ठाण्याचे जमादार भास्कर नागरे व वाघ यांनी अपघातस्थळी धाव घेतली. त्यांनी दोघांना घाटीत दाखल केले.

परंतू, तोपर्यंत दोघांचाही मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पोलिसांनी वायरबंडलचा माल असलेले अपघातग्रस्त कंटेनर व दुचाकी जप्त केली. या प्रकरणी ट्रकचालक सय्यद अकबर (रा. बिदर, कर्नाटक) याला पोलिसांनी अटक केली. तत्पूर्वी मृताचे मावसभाऊ रुस्तुम दगडू पठाडे यांच्या तक्रारीनुसार, चालकाविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, दादाराव घोडके यांच्या मुलीचे पुढील महिन्यात लग्न आहे. त्याआधीच त्यांच्यावर काळाने घाला घातला.

मराठवाडा

नांदेड : सरकारी कार्यालयात एखादे काम करायचे असल्यास नागरिकांच्या कपाळावर आठया पडतात. कारण कोणत्या कामाला किती दिवस लागतील व...

02.18 PM

औरंगाबाद : वंदे मातरम् वरून आज (शनिवारी) महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ झाला. शिवसेना-भाजप आणि एमआयएमच्या नगरसेवकांमध्ये...

01.57 PM

मुखेड : मुखेड येथील शाहीर अण्णाभाऊ साठे माध्यमिक व उच्चामाध्यमिक विद्यालयाचे शिक्षक बाबुराव परशुराम पवळे यांनी शुक्रवारी सकाळी...

11.15 AM