बीड, जालना जिल्ह्यांत दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जानेवारी 2017

औरंगाबाद - बीड आणि जालना जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. चंदनसावरगाव (ता. केज) येथील शेतकरी उद्धव आश्रूबा तपसे (वय 50) यांनी मंगळवारी (ता. 10) पहाटे झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांची दोन एकर शेती आहे, तर तडेगाव (ता. भोकरदन) येथील शेतकरी फकीरराव नऱ्हे (58) यांनी काल (सोमवारी) सायंकाळी घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांची पाच एकर जमीन असून, बॅंकेचे एक लाख रुपयांचे कर्ज आहे. नापिकीमुळे कर्जफेडीच्या विवंचनेतून या दोघांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले.
Web Title: two farmer suicide