पाण्यात बुडून दोन शिक्षकांचा परळी तालुक्यात मृत्यू

दिगंबर देशमुख
गुरुवार, 19 एप्रिल 2018

सिरसाळा (अंबेजोगाई) - अंघोळीसाठी गेलेल्या दोन शिक्षकांचा कॅनालच्या पाण्यात बुडवून मृत्यू झाल्याची घटना  बुधवारी (ता. १८) घडली. गुरुवारी त्याचे मृतदेह सापडले.  
भानुप्रकाश(वय २१) व शुभम सिन्हा (वय २१) (दोघेही राहणार दिल्ली) अशी बुडून मृत्यू झालेल्या शिक्षकांची नावे आहेत.

भानुप्रकाश हा देवगिरी ग्लोबल ऍकडमी, सिरसाळा तर शुभम हा साई पब्लिक स्कूल लोणगाव (ता. माजलगाव) या ठिकाणी इंग्लिश स्कूल मध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होते. बुधवारी लोणगावहुन येत असताना दुपारी पाच ते गोवर्धन शिवारातील कॅनलच्या पाणात आंघोळीसाठी  थांबले. कॅनॉल मधील एका पाईपला धरून आंघोळ करीत असताना हात निसटला व पाण्याच्या पाप्रवाहाने ओढले जाऊन शुभम हा पाण्यात बुडत होता. याच दरम्यान त्याचा मित्र भानुप्रकाशने हात धरून वर ओढण्याचा प्रयत्न केला. परंतु तोही पाण्यात खेचला गेल्याने दोघेही बुडाले. यावेळी आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी वाचवण्यासाठी प्रयत्न केला. पाणाचा वेग मोठा असल्याने वाचविण्याचे प्रयत्न असफल ठरले. 

काल रात्रीपासून या दोघांचा शोध सुरू होता. गुरुवारी सकाळी नऊच्या दरम्यान दोन्हीही मृतदेह सफदराबाद ( ता.परळी वै.)कॅनाल शिवारात आढळून आले.

Web Title: Two teachers die in Parali taluka drowning in water