ठाणे पोलिस, आरटीओतून संशयितांची घेतली जातेय माहिती 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 मार्च 2017

औरंगाबाद - वर्धन घोडे खून प्रकरणातील संशयित आरोपी श्‍याम मगरे हा मुंबईत वास्तव्य करीत होता. त्या कालावधीतील त्याची माहिती औरंगाबाद पोलिसांनी मागवली असून, यासबंधीचे पत्र कळवा (जि. ठाणे) पोलिसांना पाठवले आहे. तसेच अभिलाषच्या सर्व वाहनांची आरटीओतून माहिती मागवण्यात आली आहे. 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, घोडे कुटुंब मूळ कोकणातील असून ठाणे, कळवा येथील मनीषानगर भागात राहत होते. 22 फेब्रुवारी 2010 ला वर्धनचे वडील विवेक घोडे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. विवेक हे ठाणे जिल्हा कॉंग्रेसच्या मानवाधिकार विभागाचे कळव्याचे ब्लॉक उपाध्यक्ष होते. डोक्‍यात गोळी लागल्याने 28 फेब्रुवारीला उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात कळवा पोलिस ठाण्यात खुनाच्या गुन्ह्याची नोंद झाली. विशेषत: वर्धनच्या खून प्रकरणातील श्‍याम मगरे हा आधी मुंबईतही राहत होता. खुनाच्या पंधरा दिवसांपूर्वी तो शहरात आला. 

विवेक घोडे यांच्या सहा वर्षांपूर्वीच्या खुनाचा व वर्धनच्या खुनाचा परस्पर सबंध आहे का, याची पडताळणी पोलिस करीत आहेत. श्‍याम मगरेचा पहिल्या खुनाशी सबंध आहे का, याबाबतही चौकशीसाठी कळवा पोलिसांना पत्र पाठवण्यात येणार आहे. 

वाहनांची माहिती मागविली 
संशयित आरोपी अभिलाषकडे काही वाहने आहेत. त्यासह गुन्ह्यात वापरलेली उघडी कार मुंबई पासिंगची आहे. या सर्व वाहनांची आरटीओ कार्यालयाकडून पोलिसांनी माहिती मागवली आहे. 

Web Title: vardhan ghode murder case