तहसीलदाराच्या दालनात केले ग्रामस्थांनी विषप्राशन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 एप्रिल 2018

मानवत (जि. परभणी) - तालुक्यातील मानोली येथील चार ग्रामस्थांनी आपल्या मागण्यासाठी मानवत तहसिल कार्यालयात विष प्राशन केले. ही घटना गुरुवारी ता (१९) सकाळी पाऊणे अकराच्या सुमारास घडली.

मानवत (जि. परभणी) - तालुक्यातील मानोली येथील चार ग्रामस्थांनी आपल्या मागण्यासाठी मानवत तहसिल कार्यालयात विष प्राशन केले. ही घटना गुरुवारी ता (१९) सकाळी पाऊणे अकराच्या सुमारास घडली.

तालुक्यातील मानोली येथील १५ ग्रामस्थांनी १० एप्रिल रोजी तहसीलदाराना निवेदन दिले होते. यात गावातील गैरव्यवहाराची चौकशी करावी, गावात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, गावातील २२ बोगस बंधाऱ्याची चौकशी करावी अशा विविध मागण्या करण्यात आल्या होत्या. या समस्या न सोडविल्यास १९ फेब्रुवारी रोजी सामूहिक आत्महत्येचा इशारा ग्रामस्थांन दिला होता. त्यानुसार आज सकाळी ग्रामस्थ तहसील कार्यालयात दाखल झाल्यानंतर पोलिस प्रशासनाने ग्रामस्थांना ताब्यात घेण्याच्या प्रयत्न केला. या वेळी झालेल्या झटापटीत लक्ष्मण शिंदे ,चंद्रकांत तळेकर, दत्ता कदम ,शेख शगिर यांनी विष प्राशन केले. त्यांना उपचारासाठी मानवत येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. यापैकी चंद्रकांत तळेकर यांची प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी परभणी येथे हालवण्यात आल्याचे समजते.

Web Title: The villagers sucide tehsildar's office