वाळूज औद्योगिक वसाहतीतील गुन्हे फास्ट ट्रॅक कोर्टात चालविणार 

Will run the valuj industrial colonies crime in fast track courts
Will run the valuj industrial colonies crime in fast track courts

औरंगाबाद : वाळूज औद्योगिक वसाहतीत नऊ ऑगस्टला अज्ञातांनी कंपन्यांची केलेली तोडफोड व जोळपोळ प्रकरणातील गुन्हे फास्ट ट्रॅक कोर्टात चालविणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. बुधवारी (ता. 10) औरंगाबादेतील जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक मुख्यमंत्र्यांनी घेतली. त्यानंतर त्यांनी माहिती दिली. 

9 ऑगस्टला मराठा आरक्षणादरम्यान औरंगाबादेतील वाळूज औद्योगिक वसाहतीत अज्ञात हिंसक जमावाने पोलिस व्हॅनसह 25 ते 30 खासगी वाहनांची तोडफोड करून त्यांपैकी काही वाहने पेटविली होती. सुमारे 100 ते 125 कंपन्यांत तोडफोड करून जाळपोळही केली. या प्रकरणात दाखल झालेले गुन्हे फास्ट ट्रक कोर्टात चालविण्यात येतील. दंगल व त्यासारख्या प्रकरणात संबंध असलेल्या कोणत्याही राजकीय पक्षाशी निगडीत लोकांची गय केली जाणार नाही. पोलिसांकडून त्यांच्या समस्या समजून घेतल्या. त्या सोडवण्यावर भर देणार असून मोक्काच्या माध्यमातून शिक्षा जास्त झाल्या. परिणामी गुन्हेगारांवर जरब बसल्याचेही त्यांनी सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com