तळणीत दारूबंदीसाठी महिलांचा एल्गार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 एप्रिल 2017

तळणी - तळणी (ता. मंठा) येथे दारूबंदी लागू करावी या मागणीसाठी मंगळवारी (ता. 18) येथील महिलांनी मुलाबाळांसह मंठा-लोणार मार्गावर तब्बल चार तास रास्ता रोको आंदोलन केले. विशेष म्हणजे उशिरापर्यंत प्रशासनाकडून कोणीही हजर न झाल्याने उन्हात मुलाबाळांचे हाल झाले. 

तळणी येथील दारूचे दुकान गावापासून दोन किलोमीटर अंतरावर हलवावे, तसेच गावात दारूबंदी लागू करावी या मागणीसाठी मंगळवारी महिलांनी आंदोलन छेडले. सकाळी विठ्ठल मंदिरापासून फेरी काढत प्रथम दारूच्या दुकानाला कुलूप ठोकले. त्यानंतर मुलाबाळांसह महिला सकाळी दहा वाजता 

मंठा-लोणार मार्गावर दाखल झाल्या. दारूबंदीची जोरदार मागणी करत रास्ता रोको आंदोलन सुरू झाले. दुपारी दोन वाजेपर्यंत आंदोलन सुरू राहिले; मात्र तब्बल चार तास होऊनही प्रशासनाचे प्रतिनिधी येथे हजर झाले नाहीत. वाढत्या उन्हामुळे लहान मुले, वृद्धांचे हाल झाले. रस्त्यावर दोन्ही बाजूंनी चार किलोमीटरपर्यंत वाहने उभी होती. आंदोलनामुळे विविध वाहनांतील प्रवासीही ताटकळले. तळपत्या उन्हात अनेक मुलांना त्रास सुरू झाला. काही स्वयंसेवी संघटनांनी आंदोलनस्थळावर पाणीवाटप केले, त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला. रस्त्यावरील डांबर तापल्यामुळे आंदोलनकर्त्यांची गैरसोय झाली. काहींनी येथे बसण्यासाठी चटई दिली. चार तासांच्या प्रतीक्षेनंतर नायब तहसीलदार ताडेवाड यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. निवेदन स्वीकारत दारूचे दुकान हटविण्यासह दारूबंदीचे आश्वासन दिले. 

रुग्णांसाठी केला मार्ग मोकळा 
आंदोलनादरम्यान रस्त्यावर रुग्णांना घेऊन जाणारी चार वाहने अडकून पडली होती. ही बाब आंदोलकांच्या लक्षात आली. त्यानंतर माणुसकीचे दर्शन घडवीत महिलांनी या रुग्णांच्या वाहनांसाठी मार्ग मोकळा केला. 

चिमुकल्यांचा सहभाग 
दारूबंदीच्या या आंदोलनात लहान मुलांचा सहभाग लक्षणीय होता. दारूबंदीचे फलक हातात घेऊन भर उन्हात मुलांनी रस्त्यावर ठिय्या मांडला. काही ज्येष्ठांनी मुलांना झाडाच्या सावलीत बसण्यास सांगितले; मात्र दहा वर्षे वयोगटातील अनेक मुलांनी झाडाच्या सावलीत जाण्यास नकार दिला. 

Web Title: women block the road for Alcohol ban